मद्यपीने शिवीगाळ करून चाकू मारला
शिरजगाव कसबा : दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याने हटकले असता, रागाच्या भरात डाव्या हातावर चाकू मारून जखमी केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी लखनवाडी येथे घडली. सचिन बाळकृष्ण वानखडे (२३) याच्या तक्रारीवरून शिरजगाव पोलिसांनी आरोपी अक्षय प्रेमदास बादशे (२५, रा. लखनवाडी) विरुद्ध गुन्हा नोंदविला. तसेच अक्षय बादशे याने दिलेल्या तक्रारीवरून सचिन वानखडेविरुद्ध शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोदविण्यात आला.
-------------------
कुलूप तोडून ३१ हजारांचा ऐवज लंपास
मोर्शी : घरी कुणी नसल्याची संधी साधून कुलूप तोडून घरातील नगदी ३० हजार व १ हजाराचे दागिने अज्ञाताने चोरून नेल्याची घटना तीन दिवसांपूर्वी यास लेआऊटमध्ये घडली. विश्वंभर मोरे यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------------------
दुकानासमोरून दुचाकी लंपास
वरूड : दुकानासमोर उभी केलेली वापरातील १५ हजार रुपयांची दुचाकी एमएच २७ एबी १९८६ लंपास करण्यात आली. ही घटना केदार चौकातील लक्ष्मी बुक हाऊससमोर १५ सप्टेंबर रोजी घडली. धनराज बाबाराव ठाकरे (४३, रा. पवनी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------------------
उपचारार्थ दाखल युवतीचा विनयभंग
नांदगाव खंडेश्वर : येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल २० वर्षीय युवतीचा उपचाराच्या बहाण्याने इतरत्र हात लावून विनयभंग केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी घडली. तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी आरोपी मुकुंद नानाजी काकडे (३५, रा. फुबगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
---------------
कॉलेजमध्ये गेलेली मुलगी परतलीच नाही
खल्लार : अल्पवयीन मुलगी कॉलेजमध्ये जात असल्याचे आईला सांगून घरून निघाली. परंतु परत आलीच नाही. त्यामुळे वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरीून खल्लार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, मुलीचा शोध घेत आहे.