राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही

By Admin | Updated: August 23, 2014 23:41 IST2014-08-23T23:41:09+5:302014-08-23T23:41:09+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल कोणी अपमानास्पद बोलत असेल तर ते यापुढे कदापी खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी शनिवारी

Will not insult the leaders of NCP | राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही

राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अपमान खपवून घेणार नाही

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल कोणी अपमानास्पद बोलत असेल तर ते यापुढे कदापी खपवून घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेतून दिला.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी अविनाश मार्डीकर हे कायम राहतील ,असा निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. त्यांनतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निष्कासीत प्रदेश सचिव संजय खोडके यांनी पत्रपरिषद घेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय दबावतंत्राचा वापर केला, असा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर वऱ्हाडे यांनी पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली.

Web Title: Will not insult the leaders of NCP