शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

तीन वर्षांत अमरावती जिल्ह्यात ५९ नागरिकांवर वन्यप्राण्यांचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:19 IST

मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यात पाच बळीरस्त्यातील धडकेसाठी कधी मिळणार मदत?

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती: मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये पाच जणांचा बळी गेला. विशेष म्हणजे, रस्त्यावर वन्यप्राण्याची धडक लागून वाहनचालक जखमी झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद नाही. धामणगाव रेल्वे तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे अपघाताच्या मंगळवार व बुधवारी पाठोपाठ तीन घटना घडल्या. यामध्ये मंगरूळ दस्तगीर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर उमदा युवक माधव काळे (३५) यांचा गुरुवारी सेवाग्राम येथे उपचारादरम्यान निधन झाले. भाचीला पेपरला सोडून परत येत असताना रानडुकरांच्या कळपाला दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला.रानडुक्कर, रोहींच्या कळपामुळे रस्त्याने दुचाकीच नव्हे, चारचाकी वाहनेही सांभाळून चालविण्याची वेळ आली आहे. तिवसानजीक बुधवारी रोहीला धडकलेली पोलीस व्हॅन थोडक्यात बचावली.रानडुकरांचे सर्वाधिक हल्लेवन्यप्राण्यांचे हल्ले तसेच त्यांच्यामुळे झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक रानडुकरांनी घडविले आहेत. २०१६ मध्ये ११, २०१७ मध्ये १८, तर २०१८ मध्ये २० जण गंभीर जखमी झाले. २०१७ मध्ये अशा प्रकरणांमध्ये दोघांनी प्राण गमावले, तर यंदा धामणगाव रेल्वे तालुक्यात वाघाने दोघांचा जीव घेतला, तर गुरुवारी माधव काळे यांचा मृत्यू झाला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे.रस्ता अपघातात कधी मिळणार मदतवन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतात काम करताना शेतमजूर -शेतकरी जखमी झाल्यास शासन त्यांना आर्थिक मदत देते. मात्र, रस्त्यावर वन्यप्राण्यांमुळे अपघात झाल्यास मदत मिळत नाही. वनविभागाने पंचानामा करून शासनस्तरावर आतापर्यंत २७ प्रकरणे पाठविली आहेत.६२ पाळीव ठरले बळीहिंस्त्र श्वापदांच्या बळी ठरलेल्या ६२ पशूंकरिता मागील तीन वर्षांत पशुमालकांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्यात आली आहे. ती तोकडी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांना मदत अपुरीआठ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांनी नुकसान केले. दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. कितीही नुकसान झाले तरी पंचवीस हजार रुपये मदत शासन, वनविभाग करते. ती अपुरी आहे.वन्यप्राण्यांमुळे रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा पंचनामा करून आम्ही शासनस्तरावर पाठवितो. आम्ही पंचनाम्यात तसे नमूद करतो.- अशोक कविटकर, सहायक वनसंरक्षक, अमरावती

टॅग्स :wildlifeवन्यजीव