पत्नी माहेरी निघून गेली, पतीची विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:39 IST2019-03-13T18:38:33+5:302019-03-13T18:39:27+5:30

करजगाव शिवारातील घटना : शेतात विषारी द्रव केले प्राशन

Wife Maheri went away, committed suicide by her husband's poisonous substance | पत्नी माहेरी निघून गेली, पतीची विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली

पत्नी माहेरी निघून गेली, पतीची विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली

बेनोडा (शहीद) (अमरावती) : नजीकच्या करजगाव येथील एका इसमाने पत्नी सोडून गेल्याच्या रागामुळे शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

राहुल कनिराम पंधरे (27) असे मृताचे नाव आहे. पत्नी काही दिवसांपासून माहेरी निघून गेल्यामुळे राहुल हा एकटाच घरी राहत होता. सोमवारी दुपारी 2 वाजता तो घरून शेतात निघून गेला. सायंकाळ झाली तरी तो परतला नसल्याने शेजाऱ्यांनी शोध घेतला तेव्हा शेतामध्येच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. बेनोडा पोलिसांनी माहितीवरुन घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी मृतदेह राजीव शिवराम उईके (45, रा. करजगाव) यांच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच्या पार्थिवावर करजगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजीव उईके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात बेनोडा (शहीद) पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Wife Maheri went away, committed suicide by her husband's poisonous substance