शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१,६१५ कोटींच्या निधीतून होणार रस्त्यांचे रुंदीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2017 00:15 IST

ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे.

४० टक्के निधी राज्य शासनाचा : ११ राज्य महामार्गांचा समावेशअमरावती : ह्याब्रीड प्रकल्प तत्त्वावर होत असलेल्या ११ राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. १६१५ कोटींच्या निधातून सदर रस्त्यांचे कामे होणार आहेत. ११ महामार्गावरील ४५९ किमीच्या रस्त्यांचे १० मीटरचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. १,६१५ कोटींच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने त्यासंदर्भाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे सरू झाले आहे. या प्रकल्पाकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर सदर कामांच्या ई - निविदा काढण्यात येणार आहे. सदर काम ज्या कंत्राटदाराला मिळाल्यानंतर या कामांवर ६० टक्के निधींची गुंतवणूक त्याला करावी लागणार आहे. सदर काम पूर्ण झाल्यानंतर शासन सदर कंत्राटदाराला १५ वर्षापर्यंत सदर कामांचे देयके परत करणार आहे. पण या १५ वर्षांमध्ये सदर रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल त्या कंत्राटदाराला करावी लागणार आहे. या कामांचे देयके शासन १५ पर्यंत अदा करणार असल्याच्य करारना म्यावरच काम देण्यात येणार असल्याची माहिती अमरावती बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता विवेक साळवे यांनी "लोकमत"शी बोलताना दिली आहे. ४५९ किलोमीटरचे करण्यात येत असलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये १० मीटर अंतरापर्यंत रस्त्याची रुंदी वाढविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सदर रस्ते हे जूनेच असुन सर्व र स्ते हे राज्यमहामार्ग आहे. या मार्गावरुन हजारो वाहनांची रोज मोठ्याप्रमाणात वर्दळ असते. यामध्ये अमरावती- मिनी बायपास, वलगाव- दर्यापूूर, अमरावती- भातकुली-आसरा, दर्यापूर - अंजनगाव, परतवाडा- चिखलदारा -घटांग, अमरावती - चांदुररेल्वे-धामणगांव रेल्वे, अमरावती् कुऱ्हा- कौंडण्यपूर आदी मार्गांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील राज्य महामार्ग क्र १२ पुलगाव ते कारंजा असा ७६.९० किलोमीटर लांबीचा रस्त्यांच्या कामांचेही यामध्ये समावेश राहणार आहे. त्यामुळे अनेक वेळा अरुंद रस्त्यांमुळे दोन वाहने समोरासमोर पास होतांना अनेक जीवघेणे अपघात घडतात. सदर रस्त्यांचे रुंदीकरण झाल्यानंतर वाढत्या अपघातावर नियंत्रण ठेवणे सोपी जाणार आहे. व वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार आहे. सदर कामांचे अद्याप तरी ई-टेंडरींग झाले नसून सदर कामे खेचून आणण्यास पालकमंत्री प्रवीण पोटे यांचा सिंहाचा वाटा आहे. दोन महिन्यांत सदर कामे सुरू होणार असल्याचे अधीक्षक अभियंता विवेक साळवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर ई-निविदा होऊन दोन महिन्यांत सदर कामांना सुरुवात होईल कंत्राटदाराला कामांच्या तुलनेत ६० टक्के पैसे गुंतवणूक करावी लागणार आहे. - विवेक साळवे, अधीक्षक अभियंता सा.बां. विभाग, अमरावती