शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात जागोजागी मृत्यूचे सापळे

By admin | Updated: December 8, 2015 00:17 IST

राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे.

कोण घालणार आवर ? : प्रादेशिक परिवहन, पोलीस यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्षबडनेरा : राष्ट्रीय महामार्गासह बडनेरा शहरापासून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून राजरोसपणे धोकादायक वाहतूक अधिक प्रमाणात होत आहे. वाहनांच्या बाहेर आलेल्या पोल्स, लोखंडी सळाखा नागरिकांच्या जीविताला धोकादायक ठरत आहेत. नियमबाह्य वाहतुकीमुळे अनेकांचा बळी जात आहे. या धोकादायक वाहतुकीचा फटका अनेकांना बसला असून हातापायांनी पंगू होण्याची वेळ शेकडोंवर आलेली आहे. पोलीस, महामार्ग पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाच्या नाकावर टिच्चून राजरोसपणे दर दिवसाला धोकादायक वाहतूक होत आहे. यामुळे दरदिवसात लहान मोठ्या अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. बडनेरा शहरात तसेच येथून जाणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. वीज वितरण कंपनीच्या कामातील कंत्राटदाराकडून नियमबाह्य लोखंडी पोल्स, सिमेंटचे पोल्स ट्रॅक्टर किंवा इर मालवाहू गाड्यांमधून नेल्या जात आहे. असे करताना वाहतुकीचे कुठलेच नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. ३० फुटांपर्यंत पोल्स मालवाहू गाड्या किंवा ट्रॅक्टरमधून नेले जातात. मागील व समोरच्या भागात बऱ्याच प्रमाणात हे पोल्स बाहेर येतात. त्याला लाल कपडादेखील बांधलेला नसतो. एकतर अशी वाहतूक करणेच नियमबाह्य आहे. यामुळेच अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. बडनेरा शहरात अशा वाहतुकीला उधाण आले आहे. सुरळीत वाहतुकीला यामुळे मोठा अडसर निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाचे वहन, वाहनाबाहेर लोंबकळणाऱ्या लोखंडी सळाखा, क्षमतेपेक्षा अधिक माल घेऊन जाणारे ट्रक्स बडनेरा शहरातूनच महामार्गाकडे किंवा शहरात जात आहे. ही बाब अत्यंत धोक्याची ठरत आहे. नियमबाह्य व धोकादायक अशा वाहतूकदाराला कुणाचाच धाक वाटत नसल्यामुळे बिनदिक्कत अशी वाहतूक होत आहे. याला कोण लगाम घालणार, असा प्रश्न शहरवासीयांनी केला आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. बडनेरा शहरात वाहतूक प्रचंड वाढली आहे. अशात ही धोकादायक वाहतूक नाहक जिवितास धोक्याची ठरू शकते, हे नाकारता येणार नाही. शहरातील अनियंत्रित वाहतुकीने आजपर्यंत अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने भर पडत आहे. अनेक जणांचे जीव गेले असून काहींना अपंगत्व आले आहे. परंतु याप्रकाराकडे संबंधित प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. अनियंत्रित वाहतूक आणखी कुणाच्या जीवावर बेतणार, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.