कोरोनाची भीती दाखविता कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 07:44 IST2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T07:44:25+5:30
जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान आणि मोहफुलांच्या दारूची सोयदेखील मद्यपी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून केली जाते.

कोरोनाची भीती दाखविता कुणाला?
प्रशांत काळबेंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
जरूड : होळीची धूळवड मेजवानीची पर्वणीच असते. त्यानुसार जरुडात तब्बल आठ लाखांची दारू, २०० बकºया आणि २५० कोंबड्या फस्त करण्यात आल्या. कोरोना व्हायरसची भीती शासन नाहक दाखवित असून, १०० अंश सेल्सिअस तापमानात शिजविलेल्या अन्नात व्हायरस कसा राहू शकतो, अशा प्रतिक्रिया जरुडातील खवय्यांनी दिल्या आहेत.
जरूड येथे धूळवड साजरी करीत असताना, एकमेकांना रंग लावून मेजवानी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातच अनेक जण आपापल्या शेतात खमंग मेजवानीचा बार उडवित असतात. यावेळी मद्यपींची ‘तहान’ भागविण्यासाठी परिसरात पाच बीअर बार, एक शासन परवानाप्राप्त देशी दारूचे दुकान आणि मोहफुलांच्या दारूची सोयदेखील मद्यपी शेजारच्या मध्य प्रदेश राज्यातून केली जाते.
संपूर्ण जरूड ते वरूड महामार्गावर मटणविक्रीची दुकाने लागली होती. यातून तब्बल २०० ते २५० बकºया व २५० कोंबड्यांचे मांस आणि आठ ते नऊ लाखांची दारू जरूडच्या खवय्यांनी फस्त केली
कोरोना विषाणूची भीती आम्हाला नाही. सरकार नाहकच संपूर्ण देशाचं भीतीचे वातावरण पसरवित आहे. एखाद्या घटनेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कोरोना व्हायरसचा वापर होत असल्याचेही अनेकांनी सांगितले. मोबाइलवर कोरोना विषाणूबाबत जनजागृतीपर जाहिरातीतील खोकला ऐकून सरकारलाच कोरोना झाल्याचे वाटते. प्रत्येकाला फोन लावताना किळसवाणा खोकला ऐकायला येतो.
शासनाने अशी भीती दाखविणे बंद करावे, असेही मत एका व्यक्तीने रंगपंचमीच्या निमित्ताने व्यक्त केले.