शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

कौल कुणाला?

By admin | Updated: May 15, 2014 23:03 IST

सोळाव्या लोकसभेसाठी खासदारांचा मान कुणाला मिळणार? याविषयी जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. मतमोजणीची वेळ अवघ्या काही तासांवर आली आहे.

नागरिकांमध्ये उत्सुकता : दुपारी १२ वाजेनंतर निकाल बाहेर

अमरावती : सोळाव्या लोकसभेसाठी खासदारांचा मान कुणाला मिळणार? याविषयी जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. मतमोजणीची वेळ अवघ्या काही तासांवर आली आहे. यावेळी ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाल्याने कौल कुणाला? हे शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघात १६ लाख ८ हजार ८८८ मतदार आहेत. यापैकी १0 लाख १ हजार १४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ही टक्केवारी ६२.२३ एवढी आहे. अमरावती मतदारसंघातील आजवरचे हे सर्वाधिक मतदान आहे. मेळघाट, अचलपूर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघात ६८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. वाढलेल्या मतदारांचा कौल कुणाला? याविषयी चर्चा रंगत आहेत. अमरावती लोकसभेसाठी सेना-भाजप महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा, बसपाचे गुणवंत देवपारे आणि रिपाइंचे राजेंद्र गवई यांच्यासह १९ उमेदवार आहेत. राकाँने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने यावरुन वाद उफाळला आणि हा मतदारसंघ चर्चिला गेला. एक्झीट पोल, सट्टा बाजारातील चढउतार यामुळे उत्सुकता वाढली आहे. जिल्ह्यातील मतदारांचा कौल हा दुपारी १२ वाजतानंतर स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी)

विधानसभा मतदारसंघानिहाय फेरी

मरावती लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये १८३४ मतदान केंद्र आहेत. एकाच वेळी २0 टेबलवर विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी होणार आहे. साधारणपणे १५ फेर्‍यानंतर निकाल घोषित होईल. अमरावती विधानसभा मतदारसंघात २४५ मतदान केंद्र असल्याने येथील मतमोजणी लवकर आटोपेल. मेळघाटमध्ये सर्वाधिक ३५५ मतदान केंद्र असल्याने वेळ लागणार आहे.