शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून उतरताना महिलेचे हात पाय धडावेगळे

By admin | Updated: September 24, 2014 23:23 IST

रेल्वेतून खाली उतरणाऱ्या एक महिलेचा अपघात झाल्याने तिचा एक हात व एक पाय निकामी झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच चांदूरबाजार रेल्वेस्थानक परिसरात घडली.

चांदूरबाजार : रेल्वेतून खाली उतरणाऱ्या एक महिलेचा अपघात झाल्याने तिचा एक हात व एक पाय निकामी झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच चांदूरबाजार रेल्वेस्थानक परिसरात घडली. भुसावळ ते नरखेड दररोज चालणारी पॅसेंजर ट्रेन क्रमांक ५११८३ चांदूर बाजार येथे दुपारी १.४५ मिनिटांनी येते. फक्त २ मिनिटांचा थांबा घेऊन नरखेड मार्गाने मंगळवारी ही पॅसेंजर रेल्वे निर्धारित वेळेच्या २५ मिनिटे उशिरा आली.‘चांदूर’ वाक्याने केला घातचांदूरबाजार : रेल्वेमध्ये बुऱ्हाणपूर येथील नरेश नागदेव (३३ वर्षे) त्यांची पत्नी ३ मुले व मावशी शीतल लक्ष्मीचंद रामचंदानी (४५) समवेत अकोलाहून चांदूररेल्वेकडे जाण्याकरिता भुसावळ-नरखेड पॅसेंजरमध्ये चुकीने बसून बसले. सदर पॅसेंजर गाडी ही चांदूररेल्वेला जात नसल्याचे या कुटुंबाना अमरावती ते चांदूरबाजारमध्ये कळले. चुकीच्या गाडीत बसल्याचे चांदूरबाजारात कळताच हे कुटुंब रेल्वेतून उतरत असतानाच अचानक रेल्वे गाडीला सिग्नल मिळाल्याने पुढे निघत असतानाच शीतल लक्ष्मीचंद रामचंदानी (४५) ह्या उतरु लागल्या व अचानक पाय घसरुन रेल्वेच्या खाली पडल्या व त्यांचा उजवा हात व उजवा पाय रेल्वेच्या चाकात आले.महिला रेल्वे खाली पडल्याचे पाहून प्रवाशांंनी ओरडाओरड केली. स्थानिक अधिकारी विनयकुमार यांनी रेल्वे थांबविण्यास सांगितले. प्रवासी रेल्वे खाली उतरले असता त्यांना शीतल रामचंदानी जिवंत आढळल्या. उपस्थितांनी त्यांना बाहेर काढून पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. यावेळी उपस्थितांनी १०८ या रुग्णसेवेच्या रुग्णवाहिकेला संपर्क साधला असता ही रुग्णवाहिका ४५ मिनीटे रेल्वे स्थानकावर पोहचलीच नाही. ग्रामीण रुग्णालय, खासगी वाहिकांशी संपर्क साधूनही कोणतीच रुग्णवाहिका घटनास्थळावर न आल्याने नागरिकांनी या रुग्णवाहिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. गो.सी. टोम्पे महाविद्यालयाच्या खासगी रुग्णवाहिकेने जखमी शीतलला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर लगेच त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.घटनेची माहिती रुग्णवाहिकेला दिल्यानंतरही ४५ मिनिटांपर्यंत कोणतीच रुग्णवाहिका पोहचू न शकल्यामुळे शीतल रामचंदानीचा १ हात व १ पाय कापून वेगळा पडला असतानाही त्यांनी हिंमत हारली नव्हती. त्या सर्व वेदना सहन करीत शुध्दीवर होत्या. घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई चव्हाण घटनास्थळावर पोहचले. तसेच घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. रुग्णवाहिका उशिरा पोहचली घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई चव्हाण व 'लोकमत'च्या प्रतिनिधीने अनेकदा संपर्क साधूनही १०८ क्रमांकावर विचारपूस करण्यात वेळ घालविला. २ कि.मी. अंतर पार करायला या रुग्णवाहिकेला ४५ मिनिटांचा अवधी लागला.चालत्या गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात अपघात सदर प्रवासी व त्यांच्या सोबतीला असणारे हेच् चुकीच्या गाडीत बसले होते. गाडी चांदूर रेल्वे ऐवजी चांदूर बाजारला पोहचल्याचे लक्षात येताच महिला व त्यांच्या सोबतचे घाईघाईने उतरु लागले. परंतु २ मिनिटांचा थांबा घेवून रेल्वे निघत असतानाच गाडी खाली उतरण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला.