कोरोना संकटात दंड कोठून भरावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:07+5:302021-07-28T04:14:07+5:30

अमरावती : शहरातील रेस्‍टॉरेंट, हॉटेलची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत निश्चित करण्‍यात आली आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ही ...

Where to pay fines in Corona crisis? | कोरोना संकटात दंड कोठून भरावा?

कोरोना संकटात दंड कोठून भरावा?

Next

अमरावती : शहरातील रेस्‍टॉरेंट, हॉटेलची वेळ सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत निश्चित करण्‍यात आली आहे. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून ही वेळ योग्य नसल्याने सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत हॉटेल चालकांनी महापालिका आयुक्तांकडे केली. याशिवाय दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी त्यांनी केली

व्यावसायिकांची बैठक महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित होती. कोरोना कालावधीत हॉटेल व्‍यवसाय डबघाईस आलेले अशावेळी दंडात्‍मक कारवाई झाल्‍यास ३५ हजार रक्कमेचा रकमेचा कोठून भरणा करावा, त्यामुळे दंडात्‍मक रक्‍कम कमी करून सदर रक्‍कम नाममात्र असावी, अशी मागणी हॉटेल व रेस्‍टॉरेंटच्‍या व्‍यावसायिकांनी यावेळी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष पथके गठित करण्यात आलेली आहेत. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे. सर्वांचे सहकार्याने व शासन, प्रशासनाच्या मदतीने आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकू, असे आयुक्‍तांनी सांगितले.

बैठकीला नगरसेवक प्रदीप हिवसे, पशू शल्‍यचिकित्‍सक डॉ. सचिन बोंद्रे, रेस्‍टॉरेंट व हॉटेलचे आस्‍थापनाधारक गजानन राजगुरे, किशोर राजगुरे, सचिन हिवसे, बिट्टू सलुजा, सुदीप साहू, अखिलेश राठी, सारंग राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Where to pay fines in Corona crisis?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.