शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

निराधारांना एक हजाराची मदत मिळणार केव्हा? शासनाची घोषणा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

एप्रिल, मे महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. या ...

एप्रिल, मे महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते

अमरावती : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. या परिस्थितीत निराधारांना कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची स्थिती निर्माण होऊ नये, याकरिता १ हजार रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती. लॉकडाऊन सुरू झाला. मात्र, अतिरिक्त एक हजार रुपये निराधारांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत.

राज्य शासनाने संजय गांधी निराधार योजनेसह इतर विविध योजनांतील लाभार्थ्यांना लॉकडाऊनमुळे एक हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु, जिल्ह्यात लाभार्थी आजही या लाभापासून वंचित आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेसह इतर विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील ३ लाख २२ हजार १० लाभार्थ्यांना मिळतो. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लागू असलेल्या संचारबंदी काळातही अतिरिक्त एक हजार रुपये अद्याप मिळालेले नाही. मात्र, एप्रिल आणि मे महिन्याचे नियमित अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वळते केले आहे. कोरोनामुळे हाताला काम नसल्याने शेतातून उत्पादन मिळत नसल्याने या निराधारांवर उपासमारीची वेळ येत आहे. शासनाने एक हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यामुळे निराधारांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु हे अनुदानही अद्याप अप्राप्त आहे. अनेक लाभार्थी आपल्या बँकेत अनुदानासाठी चकरा मारत आहेत. परंतु आज-उद्या हे उत्तर ऐकून निराधारांना घराकडे परतावे लागत आहे.

बॉक्स

संजय गांधी निराधार योजना-६८००७

श्रावणबाळ निराधार-१८८७९३

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना-६२६४६

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना-२१०८

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना -४५६

बॉक्स

गत वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढला आहे. दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, दैनंदिन शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. याला आवर घालण्यासाठी शासनाने लॉकडाऊन व संचारबंदी लागू केली आहे. पुन्हा कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात असल्याने नागरिकांना धडकी भरत आहे.

कोट

निराधारांना शासकीय योजनेचे एप्रिल व मे महिन्याचे मानधन खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. मात्र, अतिरिक्त १ हजार रुपयांचे अनुदान अप्राप्त आहे. अनुदान आल्यानंतर वाटप केले जाईल.

- आर.एस.वानखडे,

नायब तहसीलदार

संग्रायो

कोट

लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या मदतीचा हातभार आम्हाला काही प्रमाणात लागला असला तरी आम्हाला अद्याप अतिरक्त मदत मिळाली नाही.

- सुभद्रा मानकर,

कोट

आम्हाला मंजूर असलेले मानधन वेळेत मिळत नाही. मानधन वेळेत मिळत नसल्याने उदरनिर्वाहाच्या समस्येला सामोरे जावे लागतात. शासनाने जाहीर केल्यावर तात्काळ मदत व्हायला हवी.

- मनकर्णा ठवकर,

शासकीय योजनेचा आधार असला तरी मानधन वेळेवर मिळत नाही. त्यात शासनाने लॉकडाऊन मध्ये जाहीर केलेली मदत मिळाली नाही. ही मदत तातडीने वाटप करून न्याय द्यावा.

- लाडकू सहारे,

कोट

कोरोनामुळे वयोवृद्धांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. उतरत्या वयात या अनुदानावर कामे भागवावी लागत आहे. त्यामुळे अनुदान दरमहा १ तारखेला मिळावी, अशी अपेक्षा आहे.

- धनराज राऊत,

कोट

शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. सध्या एप्रिल, मे महिन्याच्या अनुदाना जमा होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र अतिरक्त घोषित केल्याप्रमाणे एक हजार रुपयांचे मानधन अजून तरी मिळाले नाही.

- भारत मानकर,