शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

'क्या हुआ तेरा वादा?'

By admin | Updated: December 20, 2014 22:32 IST

जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत खरे; तथापि दोन दिवसांत पूर्ण होणारी चौकशी सव्वा महिना उलटूनही अपूर्णच राहिली.

चौकशी अपूर्णच : जिल्हाधिकाऱ्यांचे संपेना दोन दिवस !
इंदल चव्हाण - अमरावती
जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेत खरे; तथापि दोन दिवसांत पूर्ण होणारी चौकशी सव्वा महिना उलटूनही अपूर्णच राहिली. पे्ररणादायी राहणीमान जपणाऱ्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या कार्यप्रणालीची रीत बघून 'क्या हुआ तेरा वादा' या ओळी अलगत आठवतात.
जिल्हा स्त्री रुग्णालयात १३ नोव्हेंबर रोजी अचलपूर येथील राणी बन्सी राऊत (२०) यांचे बाळ पलंगावरून पडल्याने दगावले होते. याबाबत 'लोकमत'ने सत्य उघड केल्यानंतर लोकप्रतिनिधींनी याची गंभीर दखल घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. २५ नोव्हेंबरपर्यंत चौकशी अहवाल येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी 'लोकमत'ला सांगितले होते. तथापि २५ ला अहवाल आला नाही. त्यानंतर २८ नोव्हेंबरपर्यंतही चौकशी पूर्ण झालेली नव्हती. त्यानंतर पुन्हा १९ दिवसांनी अर्थात् १७ डिसेंबर रोजी चौकशी अपूर्णच असल्याची आठवण जिल्हाधिकाऱ्यांना करून दिली असता दोन दिवसांत अहवाल प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली असता अहवाल प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गतिमान प्रशासनाचा संकल्प सोडणाऱ्या नव्या शासनातील जिल्हाधिकाऱ्यांची ही कार्यपद्धती लोकाभिमुख ठरेल काय?