शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरदार महिलांसाठीच्या 'सखी निवास'चे काय झाले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 13:05 IST

जिल्ह्यात सहापैकी दोन ठिकाणी व्यवस्था : २३ महिलांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत 'सखी निवास' ही योजना राबविली जात आहे. वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. शासनाने नोकरी करणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सखी निवास ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभासाठी शासनाने काही अटी व शर्थीची पूर्तता करणाऱ्या व पात्र असलेल्या नोकरदार महिलांसाठी सखी निवास योजनेत या महिलेसमवेत १८ वर्षांपर्यंतची मुलगी व ५ वर्षांपर्यतचा मुलगा राहू शकतो. नोकरी करणाऱ्या महिलांना सखी निवास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिला बालकल्याण विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात ६ संस्थांमध्ये ही सुविधा सुरू केली होती. मात्र, यापैकी चार संस्था बंद पडल्या आहेत. आजघडीला २  संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची राहण्याची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये दोन्ही मिळून २३ महिला सखी निवास योजनेचा लाभ घेत आहेत.

काय आहे सखी निवास योजना?

राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित असा निवारा मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. अशा महिलांच्या निवासासाठी सध्या अतित्वात असलेल्या वसतिगृहाव्यक्तिरिक्त हे सखी निवास असतील. या योजनेला केंद्र शासनाच्या 'मिशन शक्त्ती' उपक्रमाचे साहाय्य मिळाले आहे. 'मिशन शक्ती' अंतर्गत 'संबल आणि सामर्थ्य या दोन उपयोजना राबविल्या जातात. त्यापैकी 'सामर्थ्य उपयोजनेअंतर्गत 'सखी निवास योजना कार्यान्वित करण्यासाठी अर्थसाहाय्य केले जाते. यात केंद्राचा ६० टक्के आणि राज्याचा ४० टक्के वाटा आहे. 

नोकरदार महिलांची सोय घरापासून दूर शहरांमध्ये अनेक महिला नोकरी करतात. त्यांना सुरक्षित निवारा मिळावा, या उद्देशाने शासनाने 'सखी निवास' ही योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना महिला वसतिगृह या नावाने ओळखली जात होती. सखी निवासामुळे नोकरीदार महिलांची सोय होणार आहे. 

निकष काय ? या योजनेअंतर्गत नोकरी करणाऱ्या महिलांचे मासिक उत्पन्न ५० हजारांपेक्षा जास्त नसावे. संबंधित शहरात या महिलेच्या जवळच्या नातेवाइकांचे निवासस्थान नसावे. तीन वर्षांपेक्षा कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही, आदी निकष पूर्ण करणाऱ्या नोकरदार महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.

किती नोकरदार महिलांना मिळाला लाभ? अमरावती जिल्ह्यात सहापैकी चार संस्थांनी सुरू केलेले सखी निवास बंद पडले आहे; तर शहरात दोन ठिकाणी सखी निवास सुविधा केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी २३ शासकीय नोकरदार महिला आजघडीला शहरातील दोन 'सखी निवास' सुविधेचा लाभ घेत आहेत.

"नोकरदार महिलांसाठी सुखदायी आणि दिलासादायी ठरू पाहणारी 'सखी निवास सुविधा' ही शहरात दोन ठिकाणी सुरू आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ नोकरदार महिला घेऊ शकतात." - उमेश टेकाळे, महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावती