शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Updated: May 15, 2014 02:17 IST

वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे

१६ गावांचा समावेश : मागील वर्षी पाणीपुरवठय़ासाठी २0१ टॅंकरचा वापर
अमरावती : वार्षिक सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, अवकाळी पावसाने लावलेली संततधार. यामुळे अमरावती विभागातील जलसाठय़ाची स्थिती भर उन्हाळ्यात समाधानकारक आहे. मोठय़ा प्रमाणावर झालेला पाऊस त्यासोबतच प्रशासनाचे पाणीटंचाई निवारणासाठी झालेले कोटेकोर प्रयत्न यामुळे विभागात सध्या २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. गतवर्षी याच महिन्यात तब्बल २0१ टँकरचा उपयोग पाणी पुरवठय़ासाठी करावा लागला. मात्र त्यातुलनेत यावर्षी पाणी टंचाईची स्थिती विभागात सुसह्य आहे.
गतवर्षी अवर्षणाच्या छायेत असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक १४८ गावांमध्ये पाणीटंचाई होती. या गावांची तहान भागविण्यासाठी १९३ टँकर प्रशासनाला लावावे लागले. यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात केवळ ४ गावे पाणीटंचाई सदृश आहेत. या चार गावांच्या पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाने १0 टँकर लावले आहेत. त्याचप्रमाणे गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील ११ गावांना पाणीटंचाईची झळ बसली. यावर्षी अमरावती जिल्ह्यात ८ गावे पाणीटंचाईसदृश आहेत. येथे पाणीपुरवठय़ासाठी प्रशासनाकडून ८ टँकर लावण्यात आले आहेत.
२0१३ मध्ये १७९ गावे विभागात पाणीटंचाईच्या विळख्यात होती. मात्र यावर्षी फार कमी गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. गतवर्षी अकोला जिल्ह्यात ४, वाशिममध्ये ९ आणि यवतमाळ जिल्ह्यात ७ गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. यावर्षी अकोला व वाशीम जिल्ह्यात एकही गाव पाणीटंचाईने ग्रस्त नाही.
भूजल पातळीत झालेल्या कमालीच्या सुधारणेचा हा परिणाम आहे. यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती आहे. याठिकाणी ४ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अवकाळी पाऊस, खरिपात सरासरीच्या दुप्पट झालेला पाऊस, तसेच अनुभवलेला गारपिटीचा तडाखा या सर्वांचा परिपाक म्हणजे भूजल पातळीत झालेली समाधानकारक वाढ २0१४ चा उन्हाळा सुसह्य करीत आहे. (प्रतिनिधी)