शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

टाकरखेड्यात पाणीटंचाई

By admin | Updated: April 11, 2017 00:31 IST

सहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथे नागरिकांना केला जाणार पाणीपुरवठा अपुरा असल्याने टंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे.

एक दिवसाआड पाणी : प्रतिव्यक्ती १०० लीटर पाण्याची मागणीटाकरखेडा : सहा हजार लोकसंख्या असलेल्या टाकरखेडा संभू येथे नागरिकांना केला जाणार पाणीपुरवठा अपुरा असल्याने टंचाई सदृशस्थिती निर्माण झाली आहे. एक दिवसाआड नळ येत असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाकरखेडा संभू येथे १०५ गाव पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. गावानुरूप एमबीआर असणे गरजेचे होते. हे मंजूरदेखील झाले होते. परंतु राजकीय पाठबळ कमी पडल्याने एमबीआर गावालगत असलेल्या छोट्याशा गावी रामा येथे नेण्यात आला. त्यावेळी १०० ते १५० नळजोडण्या होत्या. नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत होता. परंतु आता ६०० ते ७०० गावांत कनेक्शन झाले आहे. तसेच रामा येथून येणारा पाणीपुरवठा गावातून जळका हिरापूरलादेखील केला जातो. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्यामुळे गावात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातही पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून केवळ चारच दिवस पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सध्या प्रतिव्यक्ती सध्या ४० लीटर पाणी दिले जात आहे. ते १०० लीटर करावे जेणेकरून पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)लिकेजची समस्यारामा येथील एमबीआरमधून टाकरखेडला पाणीपुरवठा केला जातो. परंतु सदरची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची आहे. त्या परिसरात काळी जमीन असल्याने उन्हाळ्यात या जमिनीमुळेच पाईपलाईन फाटल्या जाते. त्यामुळे दर दोन दिवसानंतर पाईपलाईन लिकेज होते. आधीच पाण्याचा अल्प पुरवठा त्यात पाईप लाईन लिकेजची समस्या होत असल्याने यामुळेदेखील पाणी टंचाई निर्माण होत आहे. या सदरची पाईपलाईन ही डीआयजी गुणवत्तेची असणे गरजेचे आहे.