शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

१५० गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 5, 2017 00:01 IST

जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ..

नागरिकांना मनस्ताप, भूजलस्तर घटलालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील मेळघाटसह अन्य १५० गावांमध्ये अद्यापही तीव्र पाणीटंचाई आहे. यासाठी विविध कारणे असली तरी ती दूर करण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावरही कोसभर अंतरावरून ग्रामीण जनतेला पाणी भरावे लागत असल्याचे वास्तव आहे. मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही पाण्यासाठी आबालवृद्धांची सुरू असलेली वणवण पाहिली की, प्रशासन पाणीटंचाईबाबत नेमक्या कोणत्या उपाययोजना करीत आहे, असा प्रश्न पडतो. पाणीटंचाईबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब नाकारली असली तरी अद्यापही अनेक गावांमध्ये पाणीसमस्या कायम असल्याच्या बाबीला मात्र दुजोरा दिला आहे. मेळघाटसह जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये कृत्रीम तर काही ठिकाणी कायमस्वरूपी पाणीटंचाई भेडसावत असते. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रशासकीय सूत्रांनीच जिल्ह्यातील १५० गावांमध्ये पाणीटंचाई असल्याची बाब एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कबुल केली होती. जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्यावतीने उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाई निवारणार्थ कोटयवधीचा कृतीआराखडा तयार केला जातो. भारनियमनामुळे पाणीटंचाई तीव्रअमरावती : एखाद्या गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचे निवारण करण्यासाठी आराखड्यानुसार नवीन पाणीपुरवठा योजना, देखभाल दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकर अथवा बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती, कुपनलिका आदी उपाययोजना करण्यात येतात. मात्र, अद्यापही बहुतांश गावांमधील अनेक कुपनलिका बंद पडल्या आहेत. अनेक ठिकाणी भूजलस्तर खालावला आहे.पाठपुराव्यानंतरही दखल नाहीजिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासह जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित विविध गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या दोन्ही विभागांच्या कार्यकक्षेत मोडणाऱ्या गावांमधील पाणीसमस्या मांडण्यासाठी येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी या विभागाकडे पाठपुरावा करतात. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे. प्राधिकरणच्या बाबतीत अनेकदा हा अनुभव आला आहे. जिल्ह्यात पाणीटंचाई नाही . जेथे पाणीसमस्या होती, तेथे विहीर अधिग्रहण, कुपनलिका, तात्पुरती नळपूरक योजना, टँकर सुरू केले आहेत. याकडे पाणीपुरवठा विभाग गांभीर्यपूर्वक उपाययोजना करीत आहे.- के.टी.उमाळकर, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग