शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

नंदनवनात पाणी पेटले : दिवसाआड पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नरेंद्र जावरे  लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : शहराची तहान भागविणारा इंग्रजकालीन सक्कर तलाव दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कासवगतीच्या कामाने पावसाळा तोंडावर असताना अपूर्ण आहे. जानेवारी महिन्यापासूनच शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. अशात संबंधित विभाग आणि कंत्राटदाराची मनमानी व नियमबाह्य सुरू असलेले काम नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करणारे ठरले आहे.शहरातील सक्कर तलावामधून पावसाळ्यातही लिकेजमुळे पाणी वाहून जाते. परिणामी ते पाणी थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचे काम मागील दोन वर्षांपासून अचलपूर येथील मध्यम व लघु पाटबंधारे विभागांतर्गत सुरू आहे. परंतु, संबंधित विभागाच्या वेळकाढू आणि भ्रष्ट प्रवृत्तीमुळे दोन महिन्याच्या कामाला दोन वर्षे लावल्याचा संतापजनक प्रकार नगरवासीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. मागील दहा वर्षापासून विदर्भाचे नंदनवन व पर्यटकांचा ओढा कायम असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचा घसा कोरडा आहे. 

नव्याने निविदा, ५० लाखांनी बजेट वाढलेयंदा पुन्हा सक्कर तलावाचे काम अर्ध्यातून पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा बोलावण्यात आल्या. त्यामध्ये संबंधित विभागाने प्रचंड वेळ घेतला. परिणामी मे महिना उजाडला आणि आता कामाला सुरुवात झाली. यादरम्यान वर्ष वाढताच ५० लाखांनी बजेट वाढले.

जानेवारीतच केला तलाव खालीतलावाचे उर्वरित पुढील काम करण्यासाठी जानेवारी महिन्यातच तत्काळ तलाव रिकामा करण्याचे आदेश देण्यात आले आणि पाणीपुरवठा विभागाने तलाव रिकामासुद्धा केला. शहरवासीयांना तेव्हापासूनच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. प्रत्यक्षात काम सुरू व्हायला मे महिना उजाडला. 

थातूरमातूर काम आणि कंत्राटदाराचे पलायन सक्कर तलाव पाणीपुरवठा करणारा मुख्य तलाव आहे. त्याच्या प्रमुख भिंतीला लीकेज असल्याने १ कोटी ८३ लाखांच्या जवळपास निधी शासनाने मंजूर केला. गतवर्षी संबंधित विभागामार्फत कामाला सुरुवात झाली; परंतु आवश्यक असलेली काळी माती करजगाव आणि मुरुम गंगाधरी व कविठा खदानीमधून (लीड) देण्यात आली. संबंधित कंत्राटदाराने जवळपास काळी माती आणि मुरुमाचा शोध घेतला; परंतु इको-सेन्सिटिव्ह झोन असल्याने प्रशासनाने नियमावर बोट ठेवले आणि चिखलदरा तहानलेले राहिले. ५० लाखांपेक्षा अधिक काम करून कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शविली व पळ काढला.

प्रक्रिया सुरू झाली आहे. तातडीने काम सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. निविदा प्रक्रिया करण्यात विलंब झाला.- चैतन्य खंडारे, उपअभियंता, अचलपूर

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई