शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीत नियोजनाअभावी कोट्यवधींच्या निधीवर पाणी

By admin | Updated: September 10, 2016 00:09 IST

जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीचा विनीयोग वेळेत न केल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संथगतीने प्रक्रिया : निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकारी घेणार का दखलजितेंद्र दखने अमरावतीजिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीचा विनीयोग वेळेत न केल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा निधी पूर्णपणे खर्च होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. आरोग्य विभागाला चिखलदरा आणि धारणी तालुक्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे दोन महिन्यात कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुसरीकडे अंगणवाडी केंद्राची बांधकामे देखील अद्याप सुरू झालेली नाहीत. बांधकाम विभागाच्या दप्तर दिरंगाईमुळे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीकरिता मिळालेला निधी परत गेला आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षात हा निधी मिळाला होता. मेळघाटात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. मेळघाटातील १२ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आणि १० उपकेंद्राच्या बांधकामास जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी निधी परत गेल्याची बाब निदर्शनास आली. जिल्हा परिषदेला जलयुक्त शिवार योजनेसाठी देण्यात आलेल्या १४. ८८ कोटीच्या निधीपैकी केवळ ४ कोटी रुपयेच सिंचन विभागाने खर्च केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ११ कोटी रुपये कृषी जलसंपदा व इतर विभागाकडे वळते केले होते. सिंचन विभागही लेटलतिफअमरावती : राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला २०१० ते २०१४ या तीन वर्षांत ४ कोटी ८७ लाखांचा निधी मिळाला. हा निधी सिंचन विभागाला बिगर आदिवासी लघु पाटबंधारे वगैर आदिवासी भागात तसेच कोल्हापुरी बंधाऱ्याच्या कामासाठी खर्च करायला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने केवळ १६ लाख रुपये खर्च केल्याची बाब निदर्शनास आली होती. ही कामे करण्यासाठी जागेचे सर्वेक्षण करणे आवश्यक होते. पण सर्वेक्षण अधिकार जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला नसल्याचे कारण सांगत हा निधी परत पाठविला आहे. जिल्हा परिषदेने अंगणवाड्याचे बांधकाम करण्यासाठी सलग २ वर्षे मंजुरी दिली. मात्र २०१४-१५ या वर्षातील ३ कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत. तर २०१५-१६ या वर्षातील ३० कामांनाही अद्यापपर्यंत हात लागलेला नाही. या कामासाठी ई-टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याने ही कामे सुरू होऊ शकलेली नाहीत, असे सांगण्यात आले. मुळात अंगणवाड्यांच्या इमारतीची स्थिती बिकट असताना या कामांकडे होत असलेले दुर्लक्ष हे आता चर्चेत आले आहे. नियोजनाअभावी निधी परत जाण्याचे प्रकार वारंवार घडू लागल्याने जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी रोष व्यक्त केला आहे. मुळात शासनाकडून मिळणारा निधी अपुरा आहे. निधी वेळेत खर्च करण्याची जबाबदारी ही संबंधित यंत्रणांची आहे पण विविध कारणे दर्शवून कामांच्या बाबतीत दिरंगाई केली जाते परिणामी कामे अपूर्ण राहतात किंवा निधी परत जातो. जिल्हा परिषदेच्या सदस्यांना नंतर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, असे सदस्यांचे म्हणणे आहे. निधी खर्च करण्यासाठी वेळापत्रक तयार करून प्रत्येक कामांचे नियोजन केले पाहिजे, अशी सदस्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)-तर कोलमडणार विकासकामांचे नियोजनजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणूका लक्षात घेता जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकासकामासाठीचा निधी हा विहित वेळेत खर्ची करणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी नियोजनही तेवढेच महत्वाचे आहे. पदाधिकाऱ्यांनी आता शाांत न बसता जिल्ह़्यातील ग्रामिण भागाच्या विकासासाठी प्रशासनाच्या मागे लागून विकासकामे मार्गी लावण्याच्या दुष्ट्रीने पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा विकासाचे नियोजन कोलमडून विकासकामे खोळंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासन बैठका व आढाव्यात व्यस्तप्रशासकीय कामाचा आढावा, विविध बैठका घेण्याचा सपाटा यंत्रणेने चालविला आहे.निधीच्या विनियोगाकडे यंत्रणाप्रमुखांसह अधिनिस्थानी पाठ फिरविली आहे. अन्य कामातच धन्यता मानून विकास कामांवर वरवंटा फिरवला जात आहे. निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली असतांना विकासाचे नियोजन कोलमडले आहे.आता जिल्हा परिषद अध्यक्षांसह सदस्यांनी पुढाकार घेऊन निधीचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे.