शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 21, 2014 23:32 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी) किंवा जकात यापैकी कोणता कर लागू करावा, ही मुभा राज्य शासनाने महापालिकांना दिली आहे. मात्र कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पत्र

अमरावती: स्थानिक संस्था कर (एलबीटी) किंवा जकात यापैकी कोणता कर लागू करावा, ही मुभा राज्य शासनाने महापालिकांना दिली आहे. मात्र कॅबिनेट मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे पत्र अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने कोणती कर प्रणाली लागू करावी, याविषयी निर्णय घेणे प्रशासनाला कठीण झाले आहे.एलबीटी कर प्रणाली नकोच ही भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने १३ आॅगस्ट रोजी पार पडलेल्या राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात मुंबई वगळता २६ महापालिकांमध्ये एलबीटी की जकात? कोणती कर प्रणाली असावी हा निर्णय त्या महापालिकांनी घ्यावा, अशी मुभा दिली आहे. एलबीटी या करापासून त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांना हा निर्णय आनंददायी ठरला. बहुतांश व्यावसायिकांनी एलबीटी कराचा भरणा बंद केल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात बरीच घट आली आहे. अशातच रहदारी शुल्कदेखील बंद झाल्याने हल्ली तिजोरीत ठणठणाट असे चित्र आहे. राज्य शासनाने एलबीटीबाबतचा निर्णय महापालिकांवर साोपवून या प्रकरणातून अंग झटकण्याचा डाव रचला असल्याचे दिसून येते. मात्र महापालिकांवर या निर्णयाने कोणता परिणाम होईल, याची किंचतही काळजी शासनाने घेतली नसल्याची ओरड पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी एलबीटी बंद होणार हे जवळपास निश्चित समजल्याने एलबीटीचा भरणा बंद करुन हात वर केले आहे. याचा फटका महापालिकेला बसला आहे. एलबीटीचे उत्पन्न २५ टक्क्यांवरच थांबल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवानिवृत्ती, पुरवठादारांची देणी, कंत्राटदारांचे थकीत अशा अनेक समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. महापालिकेचा एलबीटी हा आर्थिक कणाच ढासळल्याने आयुक्तासमोर चिंतेचे सावट आहे. मात्र राज्य शासनाने निर्णय घेऊन दहा दिवस उलटले असताना महापालिकेत या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोणतेही पत्र प्राप्त होऊ नये, याबाबत खेद व्यक्त केला जात आहे. नगरविकास मंत्रालयातून पत्र प्राप्त होताच महापालिकेत कोणत्या कराची अंमलबजावणी व्हावी, याविषयी आमसभेत ठराव मंजूर करुन तो पुढील निर्णयासाठी शासनाकडे पाठविण्याची तयारी प्रशासनाची आहे. परंतु शासनाचा आदेश कधी येणार याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत. महापालिकेत जकात कर सुरु करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.