शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीत देशी दारू विक्रीचे दुकान नकोच!

By admin | Updated: November 18, 2014 22:46 IST

स्थानिक वडाळी परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे देशी दारू विक्रीचे दुकान नकोच, अशी भूमिका महिला शक्तीने घेतली आहे. या दुकानासंदर्भात मतदान प्रक्रिया न करता

अमरावती : स्थानिक वडाळी परिसरात सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरणारे देशी दारू विक्रीचे दुकान नकोच, अशी भूमिका महिला शक्तीने घेतली आहे. या दुकानासंदर्भात मतदान प्रक्रिया न करता ते हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी करण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या नावे सादर करण्यात आलेल्या निवेदनात वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीच्या सदस्यांनी मागील दहा महिन्यांपासून बंद असलेले देशी दारू विक्रीचे दुकान हद्दपार करण्याची मागणी केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी या दुकानाबाबत ‘बाटली आडवी की उभी’ यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली परंतु मतदार यादीतून अनेक महिलांची नावे गहाळ होती. परिणामी ही मतदान प्रक्रिया चुकीची असल्याचा आरोप करून त्यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी गोंधळ घातला होता. देशी दारू दुकानाच्या परवाना धारकाने राज्य उत्पादन शुल्क, महापालिका यांच्याशी संगनमत करून मतदान यंत्रणेत घोळ करण्यात यश मिळविले होते, असा आरोप महिलांनी केला होता. देशी दारू विक्रीच्या दुकानाबाबत आता कोणतीही मतदान प्रक्रिया न करता ते या भागातून कायमचे हद्दपार करावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली. वडाळीत पुन्हा देशी दारू विक्रीचे दुकान सुरू झाल्यास कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा महिलांनी दिला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तेजूसिंग पवार यांना हे निवेदन सादर केले. यावेळी अनिता वानखडे, हर्षा राऊत, नीशा चव्हाण, ललिता आंबेकर, जिजाबाई गोफणे, शोभा खोडे, पुष्पा गुहे, संगिता आंबेकर, कल्पना वैद्य, मीना खडसे आदी उपस्थित होते. याच मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, पोलीस आयुक्त, फ्रेजरपुरा पोलिसांना देण्यात आले. (प्रतिनिधी)