शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:30 IST

अमरावती : जिल्ह्यातील चार नगरपंचायतींची दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक ...

अमरावती : जिल्ह्यातील चार नगरपंचायतींची दुसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणूक मार्च महिन्यात होणार आहे. त्या अनुषंगाने मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला. त्यानुसार आता ८ मार्चला मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

जिल्ह्यातील तिवसा, नांदगाव खंडेश्वर, भातकुली अन् धारणी या तालुक्याच्या मुख्यालयी असणाऱ्या नगरपंचायतींची मुदत २९ नोव्हेंबर २०२० ला संपुष्टात आल्याने या नगरपंचायतींवर उपविभागीय अधिकारी (महसूल) यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गमुळे नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक होणार की नाही याविषयी सर्वत्र चर्चा सुरू असताना मतदार यादीच्या कार्यक्रमाचे आदेश धडकले असल्याने आता मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्यावर सध्या तरी शिक्कामोर्तब झालेले आहे.

१५ जानेवारी २०२१ हा अर्हता दिनांकावरील विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी गृहीत धरून प्रभागनिहाय विभाजन करण्यात येणार आहे. या यादीमध्ये लेखनिकाच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार व संबंधित प्रभागातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही नगरपंचायतींच्या संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत वगळण्यात आलेली नावे समाविष्ट करण्यात येणार आहे. याशिवाय चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या प्रभाग ३ (ब) साठी पोटनिवडणूक होणार असल्याने या प्रभागातही मततदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.

बॉक्स

असा आहे कार्यक्रम

* प्रभागनिहाय प्रारूप मततदार यादी प्रसिद्ध : १५ फेब्रुवारी

* हरकती व सूचना दाखल करणे : १५ ते २२ फेब्रुवारी

* प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : १ मार्च

* मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध : ८ मार्च