शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र जगताप, बच्चू कडूंची हॅट्ट्रिक

By admin | Updated: October 19, 2014 23:15 IST

यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष

अमरावती : यंदाची विधानसभा निवडणूक एकंदरच ऐतिहासिक ठरली. अमरावती जिल्ह्यातही अनेक विस्मयकारक घडामोडी घडल्या. ऐनवेळी बदललेल्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अचलपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बच्चू कडू आणि धामणगाव-चांदूररेल्वे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी केलेली विजयाची हॅट्ट्रिक आश्चर्यजनकच म्हणावी लागेल. यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी होती. महायुती-आघाडीत झालेली ताणातुणी आणि त्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय हे या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. युती-आघाडीची शकले पडली आणि पक्षांतराला पेव फुटले. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाने दुखावलेल्या अनेकांनी पक्षांतर केले. त्यामुळे निवडणुकीचा चेहराच स्पष्ट होत नव्हता. त्यात मोदींची लाट असल्याने भाजपच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. अशा स्थितीत अचलपूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा मैदानात उतरलेल्या बच्चू कडू यांच्यासाठी ही निवडणूूक काही सोपी नव्हती. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या सुरेखाताई ठाकरे, काँग्रेसच्या माजी मंत्री असलेल्या आणि राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंंगणात उतरलेल्या वसुधा देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, भाजपचे अशोक बनसोेड यांचे आव्हान बच्चू कडूंना पेलायचे होते. एकंदरीत भाजपची लाट लक्षात घेता बच्चू कडूंना त्यांचा गड राखता येणार की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. पण, भाजपच्या अशोक बनसोड यांना कडवी झुंज देत अपक्ष बच्चू कडूंनी या मतदारसंघावर तिसऱ्यांदा आपला झेंडा रोवला. सोबतच कोणत्याही आमदाराला तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी न देण्याची या मतदारसंघाची परंपराही बच्चू कडू यांनी मोडीत काढली. (प्रतिनिधी)