शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांच्या दोन गटात हिंसक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 00:22 IST

होळीच्या पार्श्वभूमीवर ‘फगवा’ मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात गुरूवारी हिंसक चकमक झाली.

पोलीस ठाण्यात तणाव : समज देऊन सोडलेअमरावती : होळीच्या पार्श्वभूमीवर ‘फगवा’ मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथीयांच्या दोन गटात गुरूवारी हिंसक चकमक झाली. हा वाद विकोपाला जात असताना काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न करता दोन्ही गटांनी फगवा अर्थात वर्गणी मागावी, असा तोडगा काढण्यात आला. शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी दुपारी सुमारे दोन तास हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू होता. दरम्यान एका तृतीयपंथीयाला शहर कोतवाली पोलीस ठाण्यासमोर बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गट परस्परांसमोर उभे ठाकले. हा संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी सहायक आयुक्तांच्या सोबतीला कमांडोंना पाचारण करावे लागले. मागील दोन दिवसांपासून हा वाद धुमसत होता.पोलीस सूत्रांनुसार, तृतीयपंथी दरवर्षी होळीच्या पर्वावर शहरातील बाजारपेठ आणि नागरी वस्त्यांमध्ये फिरून वर्गणी गोळा करतात. बुधवारी स्थानिक बेलपुरा परिसरात तृतीयपंथियांचा एक गट ढोल वाजवित फिरत असताना साबणपुरा भागातील तृतीयपंथीयांच्या अन्य एका गटाने त्यांना बेदम मारहाण केली. बेलपुऱ्यातील तृतीयपंथियांनी दीक्षा घेतली असून त्यांनी ढोलक वाजवून नव्हे तर कटोरा वाजवून फगवा गोळा करायला हवा. कोतवाली ठाण्याची मध्यस्थीअमरावती : मात्र, ते ढोलकी वाजवून वर्गणी अर्थात फगवा मागत असल्याचा आरोप साबणपुरा येथिल तृतीयपंथियांच्या एका गटाचा आहे. त्यावर दोन्ही गट बसस्थानक परिसरात परस्परांसमोर उभे ठाकले. यादोन्ही गटात हिंसक चकमक झाली. याबाबत फ्रेजरपुरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.त्यापाठोपाठ गुरुवारी बेलपुरा येथिल एक गट शहर कोतवाली पोलिसांमध्ये पोहोचला व त्यांनी साबणपुरा भागातील तृतीयपंथियांच्या गटावर आरोप केलेत. साबणपुरा येथिल गटाने आपल्याला बेदम मारहाण करुन दागिने हिसकावल्याचा आरोप केला. बेलपुऱ्यातील तृतीयपंथियांचा ‘तो’ गट शहर कोतवाली पोलीस ठाण्यात अधिक आक्रमक झाला. त्याचवेळी साबणपुरा भागातील २० ते २५ तृतीयपंथी शहर कोतवालीत पोहोचले. दोन गट परस्परांसमोर आल्याने दोन्ही गटातील तृतीयपंथी एकमेकांच्या अंगावर धावून गेलेत. अगदी पोलीस ठाण्यासमोर हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. न्याय न मिळाल्यास राजकमल चौकात आत्मदहन करु, असा इशारा एका गटाने दिल्याने तणावात भर पडली. दुपारी २ च्या सुमारास हा वाद विकोपाला जात असतानाच बेलपुरा भागातील गटाला योगेश नामक व्यक्ती दिसला.त्याला पाहताच ५० च्यावर तृतीयपंथी त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. तृतीयपंथियांचा मोठा गट पाहून योगेश नामक ती व्यक्ती शहर कोतवाली समोरच्या खेळण्याच्या दुकानात शिरली. मात्र, तेथे त्याला गाठून त्याचेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करीत दोन्ही गटातील सदस्यांना ताब्यात घेतले व ठाण्यात आणले. तृतीयपंथियांचा एकही गट ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. सरतेशेवटी नगरसेविका राधा कुरील यांनी शहर कोतवाली गाठून मध्यस्थी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसीपी नरेंद्र गायकवाड आणि पोलीस निरीक्षक निलिमा आरज शहर कोतवालीत दाखल झाल्यात. त्यांनी परिस्थिती हाताळली. (प्रतिनिधी)