शहरं
Join us  
Trending Stories
1
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
2
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
3
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
4
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
5
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
6
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
7
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
8
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
9
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
10
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
11
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
12
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
13
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
14
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
15
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
16
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
17
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
18
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
19
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
20
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन चिमुकल्यांनी रोखले

By admin | Updated: August 23, 2014 02:24 IST

सेंट फ्रॉन्सिस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक झाल्यावर पालकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.

अमरावती : सेंट फ्रॉन्सिस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सीबीएसई पॅटर्नच्या नावावर फसवणूक झाल्यावर पालकांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. मात्र संस्थाचालकांचा मनमानी कारभार सुरुच असल्याने पुुन्हा एकदा पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने कार्यालय परिसरातून बाहेर जात असतानाच त्यांचे वाहन अडवून पालकांनी निवदेन सादर केले.जेवड नगरातील सेंट फ्रॉन्सिस हासस्कुलमध्ये संस्था चालकांनी सीबीएसई पॅटर्नच्या नावाखाली विद्यार्थ्यांजवळून शुल्क वसूल केली होती. मात्र मान्यता रद्द झाल्याने सीबीएसई पॅटर्न बंद केल्याचे पालकांना सांगण्यात आले होते. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पालकांच्या निदर्शनास आले होते. याबाबत सर्व पालक एकत्रित येऊन संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराविरुध्द पालकमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत कोणतीही कारवाई झाली नाही. या प्रकरणाबद्दल राजापेठ पोलीस ठाण्यात संस्थाचालकांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पालकांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन न्यायाची अपेक्षा केली होती. मात्र संस्थाचालकांनी त्यांच्या आदेशाला न जुमानता सीबीएसई अभ्यासक्रम पूर्ववत केले नाही. त्यामुळे पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ज्या विद्यार्थ्यांनी शाळेमधूून टी.सी काढली नाही अशा विद्यार्थ्यांना २०१४-१५ च्या सत्रामध्ये शाळेत बसण्याची परवानगी द्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र संस्था चालकांनी ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश स्टेट बोर्डामध्ये केलेत त्यांना पुन्हा सीबीएसई पॅटर्नमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असे पाल्यांना सांगण्यात आले. या प्रकारबद्द्ल पुन्हा पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. याबद्दल शाळा व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्यांना पूर्वरत करण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, अशी ताकिदसुध्दा दिली आहे. मात्र २१ आॅगस्ट रोजी विद्यार्थी शाळेत गेल्यावर त्यांच्यासमोर शाळेत लावण्यात आलेला सीबीएसई पॅटर्नचा वेळापत्रक पेनाने क्रॉस करण्यात आला. विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डाच्या परीक्षेला बसविण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसले नाही तर शाळेमधून काढण्यात येईल, अशा धमक्या देण्यात आल्याचा आरोप सेंट फ्रॉन्सिसमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. या अन्यायाविरुध्द पालकांसह चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन अप्पर जिल्हाधिकारी यांचे वाहन अडवून न्याय मागतील तसेच त्यांना निवेदन दिले. पालकांमध्ये सतीश मल्ल, देवयानी चव्हाण, स्मिता सातव, सुजाता केशरवानी, ज्योती मत्ताणी, प्रिया दीपवानी, गीता छाबडा, सारिका कोल्हे, विशाल दादलानी, किशोर अजमिरे आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)