शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ परिसरात ऑनलाइन फाॅर्म भरून देणाऱ्या वाहनांचा नियमबाह्य ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

अमरावती/ संदीप मानकर आरटीओच्या परिसरात ४५० पेक्षा जास्त एजंटकम दलालांचा सुळसुळाट असतो. यासंदर्भाचा प्रश्न ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडला. मात्र, तरीही ...

अमरावती/ संदीप मानकर

आरटीओच्या परिसरात ४५० पेक्षा जास्त एजंटकम दलालांचा सुळसुळाट असतो. यासंदर्भाचा प्रश्न ‘लोकमत’ने लोकदरबारात मांडला. मात्र, तरीही आरटीओ परिसरात व्हॅनमध्ये ऑनलाईन फाॅर्म भरून देणाऱ्यांचा व्यवसाय फोफावला आहे. त्यांनी थेट आरटीओ परिसरातच दुकाने थाटली आहेत. या व्यावसायिकांना अभय कुणाचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आरटीओचे मुख्य प्रवेशव्दार बंद आहे. लहान प्रवेशव्दारातून एंट्री प्रवेश केला जातो. तेथे शिकाऊ लायसन्स व पर्मनन्ट लायसन्स काढण्याकरिता दलालांचा गराडा नागरिकांच्या अवतीभोवती असतो. त्यामुळे येथे नियमापेक्षा जास्त पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, असा सर्वांचा अनुभव आहे. आरटीओ परिसरात ३० ते ४० व्हॅनमध्ये ऑनलाईन फार्म भरून देणे, नवीन लायसन्सच्या अपार्टमेंट घेणे किंवा इतर फाॅर्म भरून देण्याचा व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना वाहन ठेण्याससुद्धा जागा नसते. विशेषत: ज्या ठिकाणी लर्निंग लायसन्स काढले जाते, अधिकाऱ्यांची वाहने उभी केली जाते, त्या ठिकाणापर्यंत एजंटांची नियमबाह्य वाहने उभी केली जातात. आरटीओ अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

बॉक्स

आरटीओच्या बाहेरही वाहने

आरटीओच्या आतील परिसरातील जागा ऑनलाइन फाॅर्म भरून देणाऱ्या वाहनचालकांनी व्यापली आहे. मात्र आरटीओच्या बाहेरही जिजाऊ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटला आहे. याकडे अतिक्रमण विभागाचे व वाहतूक पोलिसांचे दुुुर्लक्ष आहे. वाहने दोन्ही बाजूला लावल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचण निर्माण होते. येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

आरटीओच्या परिसरात बाहेरील वाहने ठेवून व्यवसाय करणे नियमबाह्य आहे. वाहने हटविण्याच्या सूचना यापूर्वीच संबंधित मोटर वाहन निरीक्षकांना दिल्या आहेत. त्याची माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल.

- रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती