चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

By गणेश वासनिक | Published: September 12, 2022 05:34 PM2022-09-12T17:34:51+5:302022-09-12T17:43:18+5:30

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर

Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

Next

अमरावती : देशात १९५२ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेशातून चित्ता नामशेष झाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले. आता तब्बल ७२ वर्षानंतर चित्ता भारतात येत आहे, त्याअनुषंगाने वनविभागाने या इव्हेंटची जोरदार तयार चालविली आहे. चित्ता हा शेडुल्ड १ च्या वन्यजीव असून, याविषयी शाळा, महाविद्यालयात जनजागृती केली जाणार आहे. प्रचार व प्रसारासासाठी वन विभाग पुढाकार घेणार आहे. 

गवताळ प्रदेशात राहणारा चित्ता हा बिबट्यासारखा दिसत असला तरी तो बिबट्या पेक्षा चपळ आणि हटके आहे. १९५२ मध्ये शेवटचा चित्ता राजस्थानातून  नष्ट झाल्याचे केंद्र शासनाने घोषीत केले होते. त्यानंतर भारतात चित्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. सर्वोच्च न्यायालयाने सन २०२० मध्ये अफ्रिकन चित्ता भारतात आणण्याची परवानगी दिली. आता  दोन वर्षानंतर आफ्रिकन चित्ता मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पामध्ये आणून सोडणार आहे, हा प्रकल्प समृद्ध गवताळ प्रदेश असून त्या भागात आफ्रिकन चित्ता वास्तव्य करणार आहे. तेथे सोलर कुंपण करुन त्या चित्त्यावर निगराणी ठेवली जाणार आहे.

जगात केवळ सात हजार चित्ते

एकेकाळी जगाच्या पाठीवर भारतात १८०० चित्त होते.  मात्र, शिकारीमुळे १९५२ मध्ये हे सर्व चित्त संपले. चित्ते हे सध्या अलगेरीया, अंगोला, बेनीन, बुकींनामध्ये आफ्रिका, इरान, केनिया, नमीबिया, निमर, टांझानीया, युगाेंडा, झिबाॅब्मे अशा १७ देशात आढळतो. हल्ली संख्या ७ हजार आहे. चित्त्यासाठी मध्य प्रदेश व राजस्थान हे प्रमुख जंगल महत्वाचे आहे. भारतात चित्ता रमला की त्याची संख्या वाढीस वेळ लागणार नाही, हे मात्र निश्चित.

अनुसूचित एक मध्ये चित्ता

चित्ता हा वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ प्रमाणे अनुसूची १ मध्ये मोडतो. त्याच्या अंगावर सरळ, गोत काळे ठिपके असतात, जे बिबट्यापेक्षा वेगळे दिसतात. चित्ता हा जगातला सर्वाधिक वेगवान प्राणी असून तो प्रति ताशी ११३ किमी अंतर धाऊ शकतो, वजन केवळ ५५ किलो असते. त्याची मान बारीक असून शरीराची रचना एखाद्या आधुनिक बाईक प्रमाणे आहे. तो जंगलात साधारणत: १३ वर्षे जगु शकतो. गवताळ प्रदेशात तो चांगला रमतो.

केंद्र सरकारच्या वने व पर्यावरण विभागाच्या गाईडलाईननुसार चित्त्याविषयी शाळा, महाविद्यालयात पोस्टर, जनजागृती केली जाणार आहे. चित्त्याचा ईतिहास, भारतातील जुने वास्तव आदी माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने वन विभागाने तयारी चालविली आहे. 

- सुनील लिमय, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

Web Title: Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.