शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

नव्या हॉल तिकीटवरच यूझर आयडी, पासवर्ड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 5:00 AM

२१ ऑक्टोबर रोजी सीईटीचा पेपर आहे. मात्र, याच दिवशी विद्यापीठाचे पेपर असल्यास दिवसभरात कधीही सीईटीचा पेपर सोडविल्यानंतर विद्यार्थी हे पेपर सोडवू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे. केवळ विद्यार्थ्यांना व्हॉट्सअँपवर सीईटीचे हॉल तिकीट टाकावे लागेल. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत केव्हाही विद्यापीठाची परीक्षा देता येईल, असे देशमुख म्हणाले.

ठळक मुद्देअंतिम वर्षांची परीक्षा : संचालकांचा व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद 

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षांची परीक्षा २० ऑक्टोबरपासून  सुरू होत आहे. यात विद्यार्थ्यांना नव्या हॉल तिकीटवर यूझर आयडी, पासवर्ड दिले आहे. ऑफलाईन, ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या परीक्षांसाठी हे हॉल तिकीट ग्राह्य धरण्यात येईल, अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी रविवारी दिली. ते परीक्षांसंदर्भात पालक, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी उद्भवू नये, यासाठी नेमलेल्या एजन्सीकडून त्या दूर करण्यात आल्याची ग्वाही देशमुख यांनी दिली. दरम्यान १७ ऑक्टोबरपासून विद्यार्थ्यांचे ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येत आहे. ४ ते ५ या वेळेत बी.ए., बी.कॉम., तर ५ ते ६ या वेळेत इतर अभ्यासक्रमांचे लोड टेस्ट तपासल्याचे त्यांनी सांगितले. जुने हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार नाही, १२ ते १९ ऑक्टोबरपर्यंतच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, २० ऑक्टोबरपासूनचे वेळापत्रक कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक महाविद्यालयात हॉल तिकीट पोहोचले आहे. तूर्त हॉल तिकीटमध्ये त्रुटी, चुका असल्याबाबत कोणतीही तक्रार नाही, असेही देशमुख म्हणाले. विद्यार्थ्यांना रविवारी हॉल तिकीट मिळावे, यासाठी महाविद्यालये सुरू ठेवण्यात आली आहेत. चार शिफ्टमध्ये परीक्षा होणार असून, सकाळी ८ ते ९.३० वाजता बी.ए., व बी.फार्म. अभ्यासक्रमांचे पेपर घेण्यात येतील. उर्वरित अभ्यासक्रमांचे पेपर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. २० ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत ओटीपी आणि मोबाईल क्रमांक रद्द करण्यात आले आहे. 

सीईटीसोबत विद्यापीठ परीक्षाही देता येईल२१ ऑक्टोबर रोजी सीईटीचा पेपर आहे. मात्र, याच दिवशी विद्यापीठाचे पेपर असल्यास दिवसभरात कधीही सीईटीचा पेपर सोडविल्यानंतर विद्यार्थी हे पेपर सोडवू शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे. केवळ विद्यार्थ्यांना व्हॉट्सअँपवर सीईटीचे हॉल तिकीट टाकावे लागेल. सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० या वेळेत केव्हाही विद्यापीठाची परीक्षा देता येईल, असे देशमुख म्हणाले.

दीड तासांची असेल ऑफलाईन परीक्षा विद्यापीठ अंतर्गत ३८६ महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. ५,५०० हजार विद्यार्थी परीक्षार्थी असल्याची यादी प्राप्त झाली आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर केंद्राधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांना स्वतंत्र पासवर्ड दिला असून, तो गोपनीय ठेवावा लागणार आहे. ऑफलाईन परीक्षा सोडविताना एचबी पेन्सील, खोड रबर, पेन सोबत ठेवावा लागणार आहे. २० ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी २५० पेपर घेण्यात येणार आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी केंद्रावर पीडीएफ फाईल मिळेल. ती विद्यार्थ्यांना प्रिन्ट काढून द्यायची आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे लागणार आहे.

 

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा