शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर वर्धाचे पाणी महादेव प्रकल्पात नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:07 IST

जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल.

ठळक मुद्देनदीजोड प्रकल्प राबविणार : पालकमंत्री अनिल बोंडे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येणार आहे. पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी जिल्ह्यात नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. प्रारंभीच्या टप्प्यात अप्पर वर्धा प्रकल्पातील पाणी महादेव प्रकल्पात सोडण्यासाठी प्रकल्प जोड कार्यक्रम नावीन्यपूर्ण योजनेत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कामकाजाबाबत जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्र्यांनी शासकीय विश्रामगृहात घेतली. पालकमंत्री बोंडे म्हणाले की, पाण्याचे समन्यायी वाटप करण्यासाठी नदीजोड प्रकल्प पुढील पाच वर्षांत विस्तृतपणे राबविण्यात येईल. अप्पर वर्धा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे महादेव प्रकल्पात पाणी सोडण्यात येईल. पंढरी मध्यम प्रकल्पात क्रेस्ट लेव्हलपर्यंत २४ दलघमी पाणीसाठा क्षमता निर्मिती झालेली आहे. उर्वरित पाणीसाठा (६२.२९ दलघमी) मार्च २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पाइप डिस्ट्रिब्यूशनचे काम सुरू करण्यात आले आहे. पाक नदी प्रकल्प व चांदस लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम जून २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ६ हजार ६१ शेतकरी व नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत ३५ हजार २२६ अर्जांना पूर्वसंमती दिली आहे. शेतकरी बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत १ लाख ६९ हजार शेतकऱ्यांना ७६१ कोटी ३० लक्ष रुपये कर्जमाफी मिळाली आहे. जे शेतकरी हिरव्या यादीत आहेत, त्यांनी नावे व कर्ज लक्षात घेऊन शासनाकडून आवश्यक निधी मिळवून घ्यावा, असे आदेश बँकांना दिले आहेत. पुनर्गठणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या समावेशासाठी प्रयत्न होत आहेत. बँकांनाही निर्देश दिले आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत कर्जवाटप करण्यात येणार आहे. कर्जमाफीसाठी सहायक निबंधक पातळीवर समिती केली आहे. पात्र शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.कृषी यांत्रिकीकरणाला बळकृषी यांत्रिकीकरण योजनेत वैयक्तिक अनुदान मिळतेच; पण बचतगट वा शेतकरी कंपनीला अवजार, ट्रॅक्टर आदींसाठी बँकेमार्फत ६० टक्के अनुदान देण्यात येत आहे. यंदा ४७ हजार ४५० शेतकरी बांधवांना ५३९.५८ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले. वाळलेल्या संत्रा झाडांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत ८२ हजार प्रतिहेक्टर मदत दिली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Damधरण