शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावात टायफाईडची साथ

By admin | Updated: March 24, 2016 00:42 IST

सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.

आबालवृध्द बेजार : खासगी दवाखाने हाऊसफुल्ल, वातावरणातील बदलाचा परिणाम नांदगाव खंडेश्वर : सकाळचा गारवा, दुपारी ऊन, अन रात्री उकाडा अशा वातावरणातील बदलामुळे शहरवासियांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत टायफाईडची लागण झाली असून येथील ग्रामीण रूग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची प्रचंड गर्दी होत आहे. लहान मुले देखील डायरियाने त्रस्त झाली आहेत. दूषित पाण्यामुळे हे आजार बळावत असल्याचे चित्र आहे. मागील महिन्यापासून नांदगाव शहरात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. ग्रामीण रुग्णालयातील माहे फेब्रुवारीची आकडेवारी बघता दैनंदिन १७५ ते २०० रुग्णांची नोंद करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये एकाच महिन्यात तब्बल ५५०० रूग्णांवर विविध आजारांसाठी औषधोपचार करण्यात आलेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून टायफाईडची लागण झाली असून आता मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्ण नांदगाव शहरातीलच आहे. त्यामुळे संपूर्ण नांदगाव शहर आजारांच्या विळख्यात जखडल्याचे चित्र दिसून येत आहे. सद्यस्थितीत लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, जुलाब, उलट्यांचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळेच विविध आजार बळावत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे मत आहे. शहरातील शासकीय व खासगी रूग्णालये फुल्ल झाली आहेत. दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार बळावले आहेत. तर आता टायफाईडने डोके वर काढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्य विभागाने या बाबीची दखल घेऊन उपाययजोना करण्याची गरज वर्तविली जात आहे.