दोन फ्लॅट, पाच तरुणी आणि वेगवेगळ्या गावचे पाहुणे ! पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:13 IST2025-10-01T19:07:41+5:302025-10-01T19:13:32+5:30
एक इसमही जेरबंद : पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश

Two flats, five young women and guests from different villages! Police exposed sex racket by sending fake customers
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील प्रसाद कॉलनी येथे एका रहिवासी संकुलाच्या दोन फ्लॅटमध्ये एका महिलेने देहविक्रयाचा व्यवसाय थाटला होता. शहर गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून त्याचा पर्दाफाश केला. येथून महिलेसह पाच तरुणी व एका इसमाला ताब्यात घेण्यात आले.
फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद कॉलनीत मंगळवारी दुपारी २.३० वाजता शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली. एका तीन मजली अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एक महिला देहविक्रयाचे रॅकेट चालवित असल्याची माहिती नागरिकांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. जवळच्या गावांमधून आणि इतर शहरांमधून २२ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींना बोलावले जाते. ग्राहकांना मोबाइलद्वारे संपर्क साधून फ्लॅटवर बोलाविले जाते आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात अशी इत्थंभूत माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली.
बनावट ग्राहकाकडून टीप
मंगळवारी दुपारी गुन्हे शाखेने बनावट ग्राहक म्हणून एका तरुणाला महिलेसोबत पाठविले. महिलेने त्याच्याशी बोलून त्याला मुलीच्या फ्लॅटवर पाठवले. यादरम्यान तरुणाकडून माहिती मिळताच गुन्हे शाखेने महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने फ्लॅटवर छापा टाकला. एका फ्लॅटमध्ये दोन तरुणी आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये तीन तरुणी आढळल्या. एक ग्राहकदेखील एका तरुणीसोबत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आला. फ्लॅटमधून ताब्यात घेतलेल्या तरुणी या २२ ते २५ वयोगटांतील आहेत. सर्वांना फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.