शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा

By admin | Updated: May 11, 2014 22:12 IST

ऑटोरिक्षा जप्त

अकोला : एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार रविवारी मध्यवर्ती बस स्थानकासमोर उजेडात आला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एक ऑटोरिक्षा जप्त केला असून, चौकशी सुरू केली आहे.
जुने शहरात राहणारे प्रभाकर दखणे यांचा एमएस-३०- इ-८९५ या क्रमांकाचा ऑटोरिक्षा आहे. त्यांच्याकडे ऑटोरिक्षाचे दस्तावेजही आहेत. काही दिवसांपूर्वी दखणे यांना एमएच-३०-इ-८९५ या क्रमांकाच्या दुसर्‍या ऑटोरिक्षातून शहरात प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी ऑटोरिक्षा चालकाला हटकले. मात्र चालक तेथून पसार झाला. त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना ही बाब वाहतूक पोलिसांना सांगण्यास सांगितले.
दरम्यान, रविवारी दखणे यांना मध्यवर्ती बस स्थानकासमोर पुन्हा त्याच क्रमांकाचा ऑटोरिक्षा दिसला. त्यांनी ही बाब वाहतूक पोलिसांना सांगितली. वाहतूक पोलिसांनी सिटी कोतवाली पोलिसांना कळविले. कोतवाली पोलिसांनी दोन्ही ऑटोरिक्षांच्या चालकांची चौकशी केली. दस्तावेज तपासल्यानंतर दखणे यांचा ऑटोरिक्षा सोडून दिला. मात्र दुसर्‍या ऑटोरिक्षाचालक सैय्यद साजिदकडे दस्तावेज नव्हते. दस्तावेज आणून देतो, असे म्हणत त्याने तेथून पळ काढला.