शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शुश्रुषागृहाची वर्षातून दोन वेळा तपासणी अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:31 IST

गजानन मोहोड अमरावती : भंडाऱ्यातील एनआयसीयूमधील अग्निकांडानंतर आरोग्य विभागाला जाग आली आणि महाराट्र शुश्रुषागृहासाठीच्या नोंदणी अधिनियमात सुधारित निकष जारी ...

गजानन मोहोड

अमरावती : भंडाऱ्यातील एनआयसीयूमधील अग्निकांडानंतर आरोग्य विभागाला जाग आली आणि महाराट्र शुश्रुषागृहासाठीच्या नोंदणी अधिनियमात सुधारित निकष जारी करण्यात आले. यासाठीची अधिसूचना शासनाने आता प्रसिद्ध केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक शुश्रुषागृहाची वर्षातून किमान दोन वेळा तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच खाटांबाबतचे निकष नव्याने जारी करण्यात आलेले आहेत.

शुश्रुषागृहाचे नोंदणी व नूतनीकरणासाठी आता खाटांनसार शुल्काची आकारणी स्थानिक प्राधिकरण करणार आहे. याशिवाय तक्रार निवारण कक्षाची स्थापना प्राधिकरणाला करावी लागेल व तपासणी करण्यासाठी स्थानिक पर्यवेक्षकीय प्राधिकारी या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. याशिवाय तक्रार निवारण कक्षाचा प्रमुुखदेखील वैद्यकीय किंवा प्रशासकीय अधिकारी असणार आहे. ज्या रुग्णावर उपचार सुरू आहे, अशा प्रकरणी २४ तासांच्या आत सुनावणी घ्यावी लागणार आहे. बांधकाम, सुविधांमधील बदल केल्याच्या सुधारित आराखड्यासह एक महिन्याच्या आत प्राधिकाऱ्याला कळवावे लागणार आहेत.

दहापेक्षा जास्त खाटांसाठी प्रत्येक पाळीत एक वैद्यकीय अधिकारी, एक अर्हताप्राप्त अधिपरिचारिका (सुतिकागृहासाठी) व अर्हताप्राप्त परिचारिका प्रत्येक तीन बेडसाठी अनिवार्य आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत इमर्जन्सी औषधांचा ट्रे, एक सक्शन मशीन व अतिरिक्त एक फूट सक्शन मशीन, आठ खाटांसाठी एक ऑक्सिजन सिलिंडर, अग्निशमन उपकरणे, ड्रेसिंग ट्रॉली अनिवार्य आहे. याशिवाय शस्त्रक्रियागृहात ऑपरेशन टेबलसह चार सिलिंडरसह भूलयंत्र, इलेक्ट्रिक सक्शन मशीन, जनरेटर कनेक्शन, फूट सक्शन मशीन, शॅडोलेस लँप, आवश्यक यंत्रसामग्री व निर्जंतुकीकरणाची साधने आवश्यक आहेत.

बॉक्स

अतिदक्षता विभागात आवश्यक बाबी

प्रत्येक खाटेला ७५ चौरस फूट क्षेत्रफळ जागा, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, प्रत्येक खाटेला स्वतंत्र ऑक्सिजन सिलिंडर, दोन सक्शन मशीन, प्रत्येक खाट पडद्याने विभाजित, प्रत्येक खाटेजवळ ईसीजी, एसपीओटू, एनआयबीपी संनियंत्रण उपकरण, व्हेंटिलेटर, डिफिब्रिलेटर, आसीयू कक्षात एमबीबीएस डॉक्टर २४ तास कर्तव्यावर, फिजिशियन किंवा सर्जन ‘ऑन कॉल’ उपलब्ध.

बॉक्स

सूतिकागृहासाठी हे आवश्यक

आपत्कालीन प्रसूतीसाठी फिटल डॉप्लर, लेबर टेबल, नवजात बालक पुनरुज्जीवन यंत्र, एक सक्शन मशीन, जनरेटर कनेक्शन, आठ खाटांसाठी एक ऑक्सिजन सिलिंडर व एक अतिरिक्त, एक इन्फंट वार्मर, सीपीआरसाठी आवश्यक यंत्रसामग्री ऑटोक्लेव्ह, अग्निशामक उपकरणे, फोरसेप याशिवाय अन्य उपकरणे आवश्यक आहेत.

बॉक्स

देयक दिले नसल्यास मृतदेह रोखता येणार नाही

शुश्रुतागृहात रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास आवश्यक न्यायवर्धक प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्त केला जाईल. रुग्णालयाचे देयक भरले नाही किंवा अन्य कोणत्याही कारणांमुळे मृतदेह रोखता येणार नाही. शुल्क अदा केले नाही म्हणून रुग्णाला ताब्यात ठेवता येणार नाही.

बॉक्स

अशी आहे रुग्ण हक्क संहिता

* रुग्णाचे आजाराचे माहिती, स्वरूप, उपचार, अपेक्षित परिणाम, गुंतागुंतीची शक्यता, उपचाराचा अपेक्षित खर्च जाणून घेण्याचा अधिकार.

* स्त्रीरुग्णाची तपासणी महिलेच्या उपस्थितीतच केली जाईल, एचआयव्ही बाधितास उपचार व देखभालीचा हक्क.

* रुग्णाला स्वागत कक्षातील नोंदवहीत तक्रार लिहिता येईल. कार्यरत डॉक्टरांची अर्हता, नोंदणी क्रमांकाची ठळकपणे लावावी.

* सेंकड ओपिनियन घेण्याचा अधिकार रुग्णाला असेल व त्यासाठी वैद्यकीय अभिलेख व छायांकित प्रत उपलब्ध करणे.

* रुग्णाला सुटी देताना वैद्यकीय निष्कर्ष, चाचण्यांचे अहवाल, दिलेले उपचार, सुटी देतेवेळी रुग्णाची स्थिती व पुढील सल्ला.

* पुरविण्यात येणाऱ्या सेवा, उपचार, आकारणीचे दर, दर्शविणारे दरपत्रक दर्शनी भागात असावे. शासनदराशी सुसंगत असावे.

-------------------------------------------