शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे बारा मेन्यूने शिक्षकांचे वाढले हार्टबीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 11:24 IST

साहित्याचा नाही पत्ता : हिशेब ठेवणार तरी कोण ?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आठवडाभर दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी आता शिक्षण विभागाने १२ मेन्यूचे प्रकार ठरवून दिलेले आहेत. प्रत्येक दिवशीचे मेन्यू कार्ड शिक्षक, मुख्याध्यापकांना दिले आहे. मुलांना पोषण आहार मिळत असला तरी १२ मेन्यू शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

विद्यार्थ्यांना पोषण आहारात नियमित खिचडी दिली जात असल्यामुळे आता आहारात वैविध्य आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून वैविध्यपूर्ण पाककृतींचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मेन्यूचा निर्णय चांगला असला तरी कडधान्य, तेल, मसाले, तांदूळ यांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. तो कसा ठेवावा, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने त्याविषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अनेक शिक्षकांनी सांगितले. शासनाने शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्याची मागणी आहे. 

अशा आहेत अडचणी नाचणीसत्व, दूध पावडर, साखर, गूळ, सोयाबीन वडी, कांदा, लसूण, तेल, जिरे, कडधान्य आदी साहित्याचा पुरवठा झालेला नाही. दिवसभरातून तीन वेळा मुलांना नाचणी सत्व, तांदळाची खीर, पुलाव, मोड आलेले कडधान्य द्यावे लागेल. नाचणी सत्व हे अन्नधान्य महामंडळाकडून पुरविले येणार आहे.

या आहेत पाककृती ? पोषण आहारात भाज्यांचा पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळीची खिचडी, चवळी खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसूर पुलाव, मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण- भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य आदी पदार्थांचा समावेश आहे.

"कोणतेही साहित्य न देताच नवीन पाककृती करण्याचे आदेश दिले आहे. यातील अनेक पदार्थ न टिकणारे आहेत. शाळेमध्ये वस्तू ठेवण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शिक्षकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागणार आहे. पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी." - राजेश सावरकर, शिक्षक

टॅग्स :Amravatiअमरावतीzp schoolजिल्हा परिषद शाळा