ट्रकमधील बॅटरी चोरी( सारांश)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:07 IST2021-01-24T04:07:07+5:302021-01-24T04:07:07+5:30

--------------------------------------------------------- मेहेरबाबा कॉलनीतून बॅटरी लंपास अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उभा केलेल्या ट्रक (एमएच२९ एमओ ७३९) मधून ६,४०० ...

Truck Battery Theft (Summary) | ट्रकमधील बॅटरी चोरी( सारांश)

ट्रकमधील बॅटरी चोरी( सारांश)

---------------------------------------------------------

मेहेरबाबा कॉलनीतून बॅटरी लंपास

अमरावती : राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उभा केलेल्या ट्रक (एमएच२९ एमओ ७३९) मधून ६,४०० रुपये किमतीची बॅटरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना २१ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. संदीप वामनराव नेवारे (४०, रा. जुनी वस्ती, बडनेरा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.

-----------------------------------------------------------

इसामाच्या हातावर चाकूने मारून जखमी

अमरावती : जुन्या वादाच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकाच्या हातावर चाकूने मारून जखमी केल्याची घटना पठाण चौकातील उर्दू असोसिएशन शाळा येथे शुक्रवारी घडली. फारूख (रा. हैदरपुरा) व अन्य अनोळखी इसमाविरुद्ध जखमी व फिर्यादी अब्दुल जब्बार अब्दुल रफीक (४३, रा. पाटीपुरा ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Truck Battery Theft (Summary)