शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
3
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
4
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
5
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
6
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
7
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
8
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
9
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
10
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
11
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
12
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
13
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
14
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
15
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
16
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
17
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
18
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
19
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
20
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
Daily Top 2Weekly Top 5

अप्राप्त पोस्टल बॅलेटचे प्रकरण तापणार

By admin | Updated: May 14, 2014 02:01 IST

अमरावती लोकसभा मतदारसंघाची १0 एप्रिल रोजी निवडणूक झाली. मतदानादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील हजारो कर्मचाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बॅलेट मतपत्रिका पाठविण्यात आल्या नाहीत.

चांदूरबाजार : अमरावती लोकसभा मतदारसंघाची १0 एप्रिल रोजी निवडणूक झाली. मतदानादरम्यान निवडणूक प्रक्रियेतील हजारो कर्मचार्‍यांना निवडणूक अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे बॅलेट मतपत्रिका पाठविण्यात आल्या नाहीत. परिणामी त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे तब्बल १२ हजार कर्मचारी मतदान करू शकले नाहीत. याची खंत व्यक्त करीत संबंधित निवडणूक अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी मतदानापासून वंचित राहिलेल्या कर्मचार्‍यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली आहे. त्यामुळे हे प्रकरण तापणार असल्याचे बोलले जाते.

आबीद हुसेन यांनी दिलेल्या लेखी माहितीनुसार, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानादरम्यान सुमारे १२ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या नियमानुसार निवडणूक कामात नियुक्त कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार संबंधित कर्मचार्‍यांना पोस्टल बॅलेट पाठवून त्याची पूर्तता झाल्यावर ते स्व्ीाकारण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकार्‍यांची आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत तैनात करण्यात आले होते. बॅलेट पेपरसाठी अर्ज स्वीकारणे तथा त्यांना पोस्टल बॅलेट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या सर्व उपविभागीय अधिकार्‍यांवर होती. याबाबत मतदानापूर्वीच बॅलेट पेपरद्वारे या कर्मचार्‍यांना मतदान करण्याची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या अधिकार्‍यांनी जबाबदारीत कसूर केल्यामुळे हजारो कर्मचारी आजही मतदानापासून वंचित राहिले, असा आरोप आबीद हुसेन यांनी केला आहे. यात अल्पसंख्यक समाजाचे जास्त कर्मचारी असल्याचे नमूद केले आहे. आता बॅलेट पेपर प्राप्त होण्याची शक्यता मावळली आहे. निवडणूक निकालाचे काऊंटडाऊन सुरु आहे. निवडणूक अधिकार्‍यांच्या अकार्यक्षमतेमुळे कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. याप्रकरणात निवडणूक विभाग दोषी अधिकार्‍यांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)