प्रजासत्ताक दिनावर राष्ट्रसंतांच्या महासमाधीला मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:32+5:302021-02-05T05:33:32+5:30

अमित कांडलकर- गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर स्वातंत्र्य संग्रामात बहुमोल योगदान असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळावर ...

Tribute to Rashtrasant's Mahasamadhi on Republic Day | प्रजासत्ताक दिनावर राष्ट्रसंतांच्या महासमाधीला मानवंदना

प्रजासत्ताक दिनावर राष्ट्रसंतांच्या महासमाधीला मानवंदना

अमित कांडलकर- गुरुकुंज(मोझरी) (अमरावती) : प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर स्वातंत्र्य संग्रामात बहुमोल योगदान असणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळावर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एनसीसी कमांडिंग ऑफिसर विवेक दिघडे यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.

यावेळी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे गुरुजी, शिक्षण विभागप्रमुख कांताप्रसाद मिश्रा, प्रचार विभागप्रमुख दामोदर पाटील, ग्रामगीता जीवन विकासप्रमुख गुलाबराव खवसे, अमोल बांबल, अरविंद राठोड आदी उपस्थित होते. यावेळी श्रीगुरुदेव विद्यामंदिरच्या एनसीसीच्या कॅडेट च्या मुली व मुलांच्या पथकाचे ध्वज संचलन करण्यात आले.त्यावतीनेही वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधी स्थळाला वर अभिवादन करण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वातंत्र्य काळात युद्धभूमीवर जाऊन भारतीय सैनिकांच्या मनोधैर्य उंचावण्यासाठी अनेक क्रांतिकारक भजने म्हटली. त्यात प्रामुख्याने चीन- भारत सीमेचा समावेश होता, हे विशेष.

Web Title: Tribute to Rashtrasant's Mahasamadhi on Republic Day