शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांनो, आॅलिम्पिक-आशियाड खेळा

By admin | Updated: December 23, 2016 00:12 IST

केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशिल आहेत.

प्रवीण पोटे यांचे आवाहन : क्रीडा ज्योत पेटवून विभागीय क्रीडा स्पर्धेला थाटात सुरूवात अमरावती : केंद्र व राज्य शासन आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सतत प्रयत्नशिल आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रात नैपुण्य मिळवावे. आॅलिम्पिक, आशियाड स्पर्धेत सहभागी होऊन आदिवासी विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्री पोटे यांनी गुरूवारी केले. चांदूररेल्वे मार्गालगतच्या राज्य राखीव बल गट क्र.९ च्या प्रांगणात आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयांतर्गत आयोजित विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर विशेष अतिथी म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, एसआरपीएफचे समादेशक जे.बी.डाखोरे, धारणीचे प्रकल्प अधिकारी एस. षण्मृगन राजन, आदिवासी विकास विभाग उपायुक्त नितीन तायडे, लेखा व वित्त उपायुक्त किशोर गुल्हाने, नगरसेविका सपना ठाकूर, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त एस.एस.जाधव, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक प्रवीण ठाकरे उपस्थित होते. पुढे बोलताना ना. पोटे म्हणाले, आदिवासी हा कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. विभागीय क्रीडा स्पर्धेत सुमारे २२०० आदिवासी विद्यार्थी एकवटल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. आदिवासींचा विकास व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली आहे. आदिवासींना न्याय देण्यासाठी उपाययोजना केली जात आहे. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळविणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा क्रांतीकारी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे पालकमंत्री म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांनी सोयी-सवलतींचा लाभ घेत शिक्षणात आघाडी घ्यावी. आयएएस, आयपीएस होऊन समाजाचा विकास करावा, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धेच्या प्रारंभी १२ जिल्ह्यातून आलेले पंच आणि विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. विभागीय क्रीडा स्पर्धा २२ ते २४ डिसेंबर या दरम्यान होणार आहेत. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाडगे तर आभार प्रदर्शन नितीन तायडे यांनी केले.