शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

By admin | Updated: August 17, 2016 00:04 IST

आदिवासी समाजाच्या नावे बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करुन रेल्वेत विविध पदे काबीज ...

दोघांना नोटीस : रेल्वे कर्मचारी संघटनांची तक्रारअमरावती : आदिवासी समाजाच्या नावे बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करुन रेल्वेत विविध पदे काबीज करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची शोधमोहिम सुरू झाली आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावरील दोन चालकांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. २२ आॅगस्ट रोजी त्यांना व्यक्तिश: हजर राहण्याचा सूचनाही देण्यात आली आहेत.नॅशनल रेल्वे कर्मचारी संघटनेने रेल्वे विभागात आदिवासींच्या हक्कावर गदा आणणारे बोगस आधिकारी, कर्मचारी शोधून काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येथील विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे १९ रेल्वे कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी बळकाविल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात बहुतांश कर्मचारी वाहक, चालकपदी कार्यरत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन कर्मचाऱ्यांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. हे दोघेही रेल्वेत चालकपदी कार्यरत आहेत. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करून वर्ग १ ते ४ ची विविध पदांवर गैर आदिवासी कार्यरत आहेत. वरिष्ठ पदांवरही बोगस आदिवासी अधिकारी ठाण मांडून असल्याने अन्य बोगस आदिवासी कर्मचाऱ्यांना अभय मिळत असल्याचे वास्तव आहे. एकट्या मध्य रेल्वे भुसावळ विभागात सुमारे २५० ते ३०० अधिकारी, कर्मचारी गैरआदिवासी असल्याचा दावा रेल्वे कमचारी संघटनांचा आहे. बनावट कागदपत्रे सदर करून खऱ्या आदिवासींच्या नोकऱ्या बळकाविणाऱ्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची ओरड आहे. चालक, वाहक अशा महत्त्वाच्या पदी बोगस आदिवासींची भरती कशी करण्यात आली? हा संशोधनाचा विषय आहे. दोन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीची आता अनुसूचित जात प्रमाणपत्र समितीने घेतली आहे. १९ कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे बनावट असताना केवळ दोनच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ‘एसटी’ जात पडताळणी समितीचा कारभार कसा चालतो, हे स्पष्ट होते. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बनावट जात पडताळणी प्रमाणपत्राच्या तक्रारीनुसार किती कर्मचाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली. याविषयी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समितीचे प्रमुख पाटीेल यांच्याशी विचारणा केली असताना त्यांनी हे सांगता येणार नाही, असे सांगितले.अमरावती, नागपूर येथे सर्वाधिक बोगस कर्मचारीरेल्वे आदिवासींच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी बळकावणारे अमरावती, नागपूर येथे मोठ्या संख्येने आहेत. अमरावतीत १९, तर नागपुरात १७ बोगस आदिवासी कर्मचारी असल्याची तक्रार आहे. बोगस आदिवासी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईसाठी पाठपुरावा सुरू असला तरी अधिकाऱ्यांची अनास्था ही यात सर्वात मोठी अडसर असल्याचे वास्तव आहे. जात पडताळणी समितीने जलद गतीने प्रकरणे हाताळणे अपेक्षित आहे. तक्रारीवर लक्ष दिले जात नाही. ही समिती खरेच जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे किंवा नाही? हादेखील संशोधनाचा विषय आहे. ठाकरे आणि बद्रे नामक दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याचे पत्र समितीकडून प्राप्त झाले आहे.- नंदराज मघाळे, माजी सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर संघ बडनेरा