शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

बिझीलँडच्या गेटवरून हुसकावले व्यापारी, पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन घोषित असताना नांदगावपेठ नजीकच्या बिझीलँड व्यापारी संकुलात काही दुकानदारांनी मंगळवारी प्रतिष्ठाने उघडण्याचा प्रयत्न केला. ...

अमरावती : महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन घोषित असताना नांदगावपेठ नजीकच्या बिझीलँड व्यापारी संकुलात काही दुकानदारांनी मंगळवारी प्रतिष्ठाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी हुसकावले. दुकान उघडणाऱ्या एका व्यावसायिकावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला, तर महसूल प्रशासनाने दोन हजारांचा दंड आकारला.

पोलीस सूत्रांनुसार, प्रिन्स गारमेंटचे गोवर्धन राधाकिसन चांदवाणी (४५, सिंधी कॅम्प, अमरावती) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची सोमवारी काही व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेत ‘लॉकडाऊन’ हटविण्याची मागणी केली होती. प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ हटविला नाही, तर व्यावसायिक मंगळवारपासून दुकाने सुरू करतील, असे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना बजावले होते. त्यानुसार मंगळवारी नागपूर महामार्गालगतच्या नांदगाव पेठ येथील बिझीलँड व्यापारी संकुलात दुकाने उघडण्यासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना पोलीस, महसूल पथकाने परतवून लावले. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे पोलीस पथकाने व्यापाऱ्यांना सांगितले. दुकाने उघडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा भादंविचे अंतर्गत गुन्हे दाखल होतील, असा समज देण्यात आला. त्यानंतर व्यावसायिक आल्यापावली परतले. पोलीस, महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईने व्यावसायिकांचे दुकाने सुरू करण्याचे मनसुबे हाणून पाडले.

-----------

एका दुकानदाराने दुकान उघडले होते. त्याचाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत भादंविचे १८८ गुन्हे दाखल केले आहे. मात्र, इतर व्यावसायिक दुकाने उघडण्यासाठी आले होते. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत सविस्तर माहिती दिली. ती त्यांना पटली आणि व्यावसायिक परत गेले.

- अरुण कुळकर्णी, ठाणेदार, नांदगाव पेठ.

----------------

महसूल पथकाने मंगळवारी बिझीलँड व्यापारी संकुलाची पाहणी केली. केवळ एक दुकान सुरू होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने दोन हजारांच्या दंडाची पावती दिली आहे. लॉकडाऊनमध्ये कापड दुकाने सुरू करता येणार नाही, असे स्पष्ट कळविले आहे.

- संतोष काकडे, तहसीलदार, अमरावती.