शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाची तोडफोड

By admin | Updated: July 19, 2016 00:10 IST

मागील दहा दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा विरोध म्हणून ....

जेसीबीच्या काचा फोडल्या : राजापेठ ठाण्यात तक्रार दाखलअमरावती : मागील दहा दिवसांपासून शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा विरोध म्हणून सोमवारी सायंकाळच्या सुमारास अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी नवगर्जना संघटनेचे अध्यक्ष गणेश मारोडकर व अन्य २० ते २५ जणांविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.हमालपुरा झोन कार्यालयातील अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या कक्षाची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास बेधुंद तोडफोड करण्यात आली. कार्यालयाबाहेरील दोन जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या तर कुत्तरमारे यांच्या दालनातील खुर्च्या, तावदाने फोडण्यात आली. यावेळी दुपारची कारवाई आटोपून कुत्तरमारे व त्यांचे सहकारी पुन्हा दुसऱ्या कारवाईसाठी रवाना झाले होते. हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी शिपाई मजहर हुसैन, पुंडलिक मानके व देशमुख नामक चालक असे तिघेच कार्यालयात होते. कुत्तरमारे यांनी यासंदर्भात राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादंविच्या कलम ३५३, १४३, १४७, १४८, ३, ४, डॅमेज आॅफ पब्लिक प्रॉपर्टी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान यासंदर्भात नवगर्जना हॉकर्स संघटनेचे उपाध्यक्ष सुरज चढार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या तोडफोडीला दुजोरा दिला. अतिक्रमण निर्मूलन कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले साहित्य परत द्यावे, यासाठी अनेक फेरीवाले कुत्तरमारे यांना विनंती करण्यासाठी गेले होते. मात्र, कुत्तरमारे, सवाई आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी फेरीवाल्यांना परत पाठविल्याने संतापाच्या भरात त्यातील काहींनी कुत्तरमारेंच्या कार्यालयात तोडफोड केल्याची प्रतिक्रिया चढार यांनी दिली आहे. गणेश मारोडकर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. बाहेरच्या जेसीबीच्या काचा फोडल्या, तथा दालनाच्या दरवाज्यासह खुर्च्यांची मोडतोड केली. या घटनेची तक्रार राजापेठ ठाण्यात नोंदविली आहे. - गणेश कुत्तरमारे, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन विभाग. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, अशी तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानुसार आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यास पथक रवाना करण्यात आले आहे. - शिशीर मानकर, ठाणेदार, राजापेठ ठाणे.