शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आज मंगळ, शनी पृथ्वीच्या समीप

By admin | Updated: May 25, 2016 00:37 IST

२५ मे रोजी मंगळ व शनि पृथ्वीच्याजवळ येणार आहे. ही अद्वितीय खगोलीय घटना १२ इंच व्यासाच्या आरशाच्या भव्य परावर्ती दूर्बिणीतून पाहता येणार आहे.

अमरावती : २५ मे रोजी मंगळ व शनि पृथ्वीच्याजवळ येणार आहे. ही अद्वितीय खगोलीय घटना १२ इंच व्यासाच्या आरशाच्या भव्य परावर्ती दूर्बिणीतून पाहता येणार आहे. फरशी स्टॉप येथील विनाअपार्टमेंटमध्ये या नि:शुल्क शिबिराचे सायंकाळी ७ ते १० दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. मंगळ ग्रह यावर्षी जास्तीत जास्त पृथ्वीच्या जवळ आला असल्याने या ग्रहाचा स्पष्ट बिंदीसारखा गोल आकार, लाल रंग विशिष्ट परिस्थितीत त्यावरील दऱ्यांचे काळे डाग व ध्रृव प्रदेशावरील बर्फाची टोपी स्पष्ट दिसणार आहे. शनी ग्रहाचे सुंदर वलय व त्याच्यात टायटन नावाचा चंद्र पाहता येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला मराठी विज्ञान परिषद अमरावती शाखा प्रमुख रवींद्र खराबे मार्गदर्शन करणार आहे. आकाशातील ठळक तारे, राशी, नक्षत्रे, अभिक्रा इत्यादींची माहिती करून दिली जाणार आहे. ग्रह-ताऱ्यांविषयी नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे चर्चात्मक स्वरुपात निरसन केले जाणार आहे. तसेच खगोलशास्त्रात करिअर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्णत: नि:शुल्क असून सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठी खुला राहणार आहे. अवकाशातील पिंडाबाबत जनसामान्यांत बरेच गैरसमज बाळगले जातात. वास्तविक कोणत्याच ग्रहाचा कोणाच्याच जीवनात तथा व्यवहारात हस्तक्षेप नसतो. कोणावरच ग्रहाचे बरे-वाईट परिणाम होत नाहीत. यासाठी जिज्ञासू, अभ्यासू तसेच विद्यार्थ्यांनी व पालकांनी सर्व गैरसमज झुगारून देऊन मंगलमयी मंगळ व विलोभनीय शनी गृहाचे अवलोकन करण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे खगोलशास्त्र शाखाप्रमुख रवींद्र खराबे, प्रवीण गुल्हाने, रोहीत कोठाडे, भूषण ब्राम्हणे व पंकज गोपतवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)