आज प्रेम, जिव्हाळा जपण्याचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:37+5:30

विजयादशमीच्या या पर्वावर शस्त्रांची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळनंतर एकमेकांच्या घरी जाऊन नात्यातील गोडवा टिकविला जातो. दसरा सणांनिमित्त बडनेरा रोड स्थित दसरा मैदानात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे याच वेळी पारंपरिक खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर जाणार आहेत. ती बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अमरावतीकरांची प्रचंड गर्दी होईल.

Today is a celebration of love, communion | आज प्रेम, जिव्हाळा जपण्याचा उत्सव

आज प्रेम, जिव्हाळा जपण्याचा उत्सव

Next
ठळक मुद्देबाजारपेठा गजबजल्या : हव्याप्र मंडळातर्फे पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सोने म्हणून आपट्याची पाने ज्येष्ठांच्या डोक्यावर आणि समवयस्कांच्या हाती देऊन प्रेम-जिव्हाळ्याचे नातेसंबध जपण्याचा दसरा सणाचा दिवस आहे. विजयादशमीच्या या पर्वावर शस्त्रांची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळनंतर एकमेकांच्या घरी जाऊन नात्यातील गोडवा टिकविला जातो. दसरा सणांनिमित्त बडनेरा रोड स्थित दसरा मैदानात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे याच वेळी पारंपरिक खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर जाणार आहेत. ती बघण्यासाठी दरवर्षीप्रमाणे अमरावतीकरांची प्रचंड गर्दी होईल.
दरवर्षी दसरा सणाला अंबादेवी व एकवीरादेवीची पालखी सीमोल्लंघन करून सायंकाळी ५ च्या सुमारास दसरा मैदानात मोठ्या थाटात पोहोचते. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. येथेच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे मंगळवारी पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. दसरा महोत्सवात डिग्री कॉलेज आॅफ फिजीकल एज्युकेशनचे अडीच हजार ते तीन हजार विद्यार्थी प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. या प्रात्यक्षिकांमध्ये सामूहिक कराटे, ड्रील, मल्लखांब, जिम्नॅस्टिक, मार्शल आर्ट, लेझीम, एरोबिक्स ड्रिल, टॉर्चेस मार्चिंग, बॉडी बिल्डिंग, रशियन ड्रिल, ढाल-तलवार, दांडपट्टा, भाला ड्रिल, डम्बेल्स आदी कवायती सादर होणार आहेत. याशिवाय देशातील विविध संस्कृतींचे प्रदर्शन अमरावतीकरांपुढे येथे सादर केले जाणार आहेत.
यंदा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शैलेश नवाल राहतील. प्रमुख अतिथी म्हणून साई (दिल्ली) येथील महासंचालक संदीप प्रधान, कार्यकारी संचालक अंजनकुमार मिश्रा यांची विशेष उपस्थिती राहील. संस्थेचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, कोषाध्यक्ष सुरेशराव देशपांडे, डीसीपीईचे प्राचार्य के.के. देबनाथ, सचिव माधुरी चेंडके, श्रीकांत चेंडके, डॉ. रमेश गोडबोले, सचिव वसंतराव हरणे, जयंत गोडसे, दीपा कारेगावकर, सचिव रवींद्र खांडेकर, संजय तीरथकर आदींनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

बोस, राजगुरूंनी लावली होती हजेरी
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे दरवर्षी दसरा महोत्सवात दसरा मैदानात पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जातात. १९२६ पासून चालत आलेल्या या परंपरेला अमरावतीच्या सांस्कृतिक, सामाजिक चळवळीत मानाचे स्थान आहे. या महोत्सवाची परपंरा ८९ वर्षांपासून अविरत सुरू आहे. या महोत्सवाला देशनायक सुभाषचंद्र बोस, शहीद राजगुरू यांच्यासह दिग्गज हस्तींनी हजेरी लावली आहे.

बाजारपेठा फुलल्या
दसरा सणानिमित्त अमरावतीकरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दसऱ्यासाठी बाजारपेठाही फुलल्या आहेत. सोने व कापड खरेदीची झुंबड शहरात पाहायला मिळत आहे. आपट्याची पाने, झेंडूची फुले, आंब्यांची पाने बाजारात दाखल झाली आहेत. दसºयाच्या पूर्वसंध्येलाच बाजारपेठेत गर्दी झाली आहे.

Web Title: Today is a celebration of love, communion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा