शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

कराचे १७.९६ कोटी थकीत

By admin | Updated: March 1, 2015 00:23 IST

मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची आतापासून ‘मार्च एडिंग’ची लगबग सुरु झाल्याचे दिसून येते.

अमरावती : मार्च महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाची आतापासून ‘मार्च एडिंग’ची लगबग सुरु झाल्याचे दिसून येते. अशातच एलबीटी बंद होणार असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी मालमत्ता कर वाढीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. परिणामी मालमत्ता कराच्या थकीत १७.९६ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. विशेष कर वसुलीच्या माध्यमातून ‘कर्मचारी नागरिकांच्या दारी’ हे अभियान राबविले जात आहे.महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे उत्पन्न ३८ कोटी ९६ लाख ७९ हजार २१० रुपये अपेक्षित होते. त्यानुसार पाचही झोनचे सहायक आयुक्तांनी २०१४- २०१५ या आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कृती आराखडा तयार करुन थकित रक्कम कमी आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मालमत्ता कराची थकित रक्कम जास्त प्रमाणात वसूल व्हावी, यासाठी आयुक्तांनी कर वसुली लिपीक, अधिकाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्याचे ठरविले आहे. आगामी काळात कोणत्या झोनमध्ये मालमत्ता कराची रक्कम सर्वाधिक वसूल केली जाते, हे एप्रिल महिन्यात स्पष्ट होईल. १ एप्रिल २०१४ ते ११ फेब्रुवारी २०१५ या दरम्यान २१ कोटी ५९ लाख ६६९ रुपये वसूल करण्यात प्रशासनाला यश आले आहे. थकित मालमत्ता कराची रक्कम वेळेपुर्वी भरल्यास व्याजाच्या रक्कमेतून सूट देण्याची सवलत देखील प्रशासनाने दिली होती. या उपक्रमाचा अनेक मालमत्ता धारकांनी लाभ घेत वेळेतच कराचा भरणा करुन प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र थकित १७.९६ कोटी रुपयांच्या कराची रक्कम वसूल करण्यासाठी उणेपुरे महिना शिल्लक असून ती वसूल करण्यासाठी कर वसुली लिपीक, सहायक आयुक्तांना रात्रीचे दिवस करावे लागणार आहे. हल्ली प्रभाग क्रमांक १ उत्तर झोन रामपुरी कॅम्प, प्रभाग क्रमांक २ मध्य झोन राजकमल चौक, प्रभाग क्रमांक ४ दक्षिण झोन बडनेरा या कार्यालयातील कर वसुली आघाडीवर असल्याचे आकडेवारीने दिसून येते. अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार असून प्रशासनाने तशी तयारी चालविली आहे. येत्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराचे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न गृहित धरुनच सादर होण्याचे संकेत आहे.