शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मांजरखेड, बासलापूर शिवारात वाघाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागणी चांदूर रेल्वे : येथून पाच किमी अंतरावरील मांजरखेड (कसबा) व बासलापूर ...

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्त करण्याची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे मागणी

चांदूर रेल्वे : येथून पाच किमी अंतरावरील मांजरखेड (कसबा) व बासलापूर शिवारात वाघाची दहशत पसरली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वर्तुळ अधिकारी यांना बुधवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तालुक्यातील मांजरखेड (कसबा) व बासलापूर भागात चार ते पाच दिवसांपासून वाघाची दहशत पसरली आहे. शेतकरी अमोल अवधूतराव आखरे यांनी शेतात रात्री ८ ते १० वाजताच्या दरम्यान वाघ पाहिला तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही सदर वाघाचे दर्शन झाल्याचे निवेदनात नमूद केले आहे. शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भीतीमुळे शेतमजूर कामावर येत नाही. परिणामी शेतीची कामे ठप्प झाली आहेत. अशामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना जीवितहानीचाही धोका होऊ शकतो. गावालगतच हे क्षेत्र असल्याने ग्रामस्थांनाही धोका होऊ शकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नागरिकांना दहशतमुक्त करावे, अन्यथा काही जीवितहानी झाल्यास वनविभाग जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देताना अमोल आखरे, मोहनप्रसाद दुबे, भारतराव आखरे, जयेंद्र दुबे, धनंजय खोंडे, दीपक बिजवे, माधव आखरे, प्रदीप घाटोळ, गुड्डू जयस्वाल, मंगेश तसरे, सचिन खोंडे, सुरेंद्र मेश्राम, विजय शिरभाते, राजू वाघ, पुंडलिक वाघ, शंकर केवट, श्याम जाधव, तारासिंह जाधव, सुधीर जाधव, अंबादास जाधव, अवधूत आखरे आदींची उपस्थिती होती.

-----------

(फोटो ओळ - चांदूर रेल्वे - वनविभागात निवेदन देण्यासाठी आलेले शेतकरी व वाघाच्या पायाच्या ठशांचे शेतातील निशाण)