शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

By admin | Updated: August 10, 2015 00:02 IST

मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना ...

जिल्ह्याला पाऊणेनऊ कोटी : साडेतीन कोटींचे बँकांना वाटपअमरावती : मागील वर्षी पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळस्थिती होती. पैसेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने प्रचलीत नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी २४२ कोटी ९९ लाख ६९ हजार ४५४ रुपयांचा निधी उपलब्ध केला होता. यामध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना यंदा पुन्हा ८ कोटी ७५ लाखांचा निधी शासनाद्वारा जिल्ह्यास वितरित करण्यात आला आहे.या दुष्काळ निधीचे २९ हजार २९९ खातेदारापैकी ७ हजार ४११ शेतकऱ्यांसाठी ३ कोटी ४८ लाख ८६ हजार १६१ रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात बँकेत जमा करण्यात आलेला आहे. यापैकी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ हजार २०४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ९१ लाख २९ हजार ९८० रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, वरुड तालुक्यात ५० हजार व चिखलदऱ्यात ४३, ४ हजार ३६० रुपये सद्यस्थिती जमा करण्यात आले आहे. ही टक्केवारी ३९.८७ आहे. यामध्ये भातकुली, तिवसा, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, धारणी तालुके निरंक आहेत.शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अमरावती तालुक्यात ३ हजार शेतकऱ्यांसाठी १ कोटी २४ लाख ९ हजार ५७०, भातकुली तालुक्यात ४४२ शेतकऱ्यांसाठी २१ लाख १० हजार ७१५, नांदगाव तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांसाठी ३६ लाख ६९ हजार ३७०, दर्यापूर तालुक्यात १ हजार १४१ शेतकऱ्यांसाठी ५१ लाख ६० हजार २००, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ७४ लाख ६ हजार ४८०, चांदूरबाजार तालुक्यात १२ लाख ८० हजार ७११, मोर्शी तालुक्यात ५१७ शेतकऱ्यांसाठी, २३ लाख ६४ हजार ७५५, वरुड तालुक्यात १२ शेतकऱ्यांसाठी ५० हजार व चिखलदरा तालुक्यात ९६ शेतकऱ्यांसाठी ४ लाख ३४ हजार ३६० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामात कमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षीचा दुष्काळ, त्यानंतर रबी हंगामात अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असतानाच दुष्काळाचा प्रलंबित निधी ऐन अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना मिळाला आहे. (प्रतिनिधी)यंदा वितरित केलेला मदत निधीगतवर्षी वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी पाऊणेनऊ कोटी रुपये शासनाने जिल्ह्यात वितरित केले आहे. यामध्ये अमरावती तालुक्याला २ कोटी २५ लाख ६८ हजार १२५, भातकुली २५ लाख, धामणगाव ८२ लाख २८ हजार, नांदगाव १ कोटी ४० लाख, दर्यापूर ९० लाख, अंजनगाव १ कोेटी, चांदूररेल्वे ३० लाख, चांदूर बाजार १ कोटी, वरुड ६० लाख, धारणी ९ लाख ५५ हजार ८०, व चिखलदरा तालुक्यास १२ लाख ४८ हजार ७९५ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.