बिबट शिकारीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:17 IST2021-02-17T04:17:44+5:302021-02-17T04:17:44+5:30

पान २ ची बॉटम तळेगाव दशासर येथून घेतले ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चांदूररेल्वे : चांदुर रेल्वे प्रादेशिक ...

Three arrested in bibat poaching case | बिबट शिकारीप्रकरणी तिघांना अटक

बिबट शिकारीप्रकरणी तिघांना अटक

पान २ ची बॉटम

तळेगाव दशासर येथून घेतले ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चांदूररेल्वे : चांदुर रेल्वे प्रादेशिक परिक्षेत्रामधील दत्तापुर नियतक्षेत्रामधील तळेगाव दशासरमध्ये शेताच्या धुºयाला विद्युत प्रवाह लावुन बिबटाची शिकार केल्याच्या प्रकरणात तळेगाव दशासर येथुन संशयीत तिन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. वनविभाग व ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय यांना ही माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष कोकाटे यांना सुचित केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र वनविभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. चौकशीअंती प्रकरणातील आरोपींनी शेताच्या धुºयाला तार लावून त्यामध्ये विद्युत प्रवाह सोडुन बिबटची शिकार करुन त्याला आधी जमिनीमध्ये पुरवुन त्यानंतर आठ दिवसांनी जाळून नष्ट केल्याचे त्यांच्या बयाणात कबुल केले आहे. यानुसार, आरोपी प्रभाकर चंपतराव शिंदे (रा. तळेगाव दशासर, ता.धामणगाव रेल्वे) व विजय पंजाबराव नागोसे (रा.कोठा अलिपुर, ता.बाभुळगाव), रविंद्र विठ्ठलराव थुल (रा.कोठा अलिपुर, ता.बाभुळगाव, जि. यवतमाळ) यांचे विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये वनगुन्हा १५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

एलसीबीचे एपीआय गोपाल उपाध्ये, वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष कोकाटे, चांदूर रेल्वे वर्तुळाचे वनपाल किशोर धोत्रे, वनरक्षक वीरेंद्र पवार, राजन हिवराळे, हवालदार त्र्यंबक मनोहरे, निलेश डांगोरे, प्रविण अंबाडकर, अमोल केंद्रे हे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले. सदर वन्यजव गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक लिना आदे करीत आहेत.

-----

Web Title: Three arrested in bibat poaching case