शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना तेलंगणातून अटक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:51 IST

गाडगेनगर ठाण्याच्या पथकाने तेलगंणा राज्यातील पोलिसांच्या मदतीने हैदराबाद येथून मंगळवारी अटक केली.

अमरावती : घरफोडीच्या दाखल गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेल्या तीन आरोपींना गाडगेनगर ठाण्याच्या पथकाने तेलगंणा राज्यातील पोलिसांच्या मदतीने हैदराबाद येथून मंगळवारी अटक केली. त्यांना पोलीस खाक्या दाखविताच शहरातील एकूण आठ गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. बसवाराज जगदेव मईलार (३३, रा. आंबेडकर चौक लेबर अड्डा रेल्वे स्टेशन जवळ लिंगमपल्ली हैदराबाद), शेख अन्सार शेख कय्युम (३६, रा. फलकनुमा ,अलजुबेल कॉलनी चंद्रानी गुट्टा हैदराबाद), सैय्यद आजम सय्यद अकबर (२६, रा. फलकनुमा छत्री नाका चंद्रानी गुट्टा), असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी सध्या पोलीस कठोडीत असून, अधिक काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गाडगेनगर ठाण्यात दाखल अपराध क्रमांक १०००/२०१९ कलम ३८० भादंवि गुन्ह्यात सदर आरोपी हवे होते. तेलगंणा पोलिसांना पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी मथुरा डेअरीत झालेल्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज पाठविले होते. त्यात त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींशी ते फुटेज मिळते जुळते आढळले होते. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांचे पथक हैद्राबात येथे रवाना झाले होते. पथकाने आरोपींना अटक केली. आरोपींना पीसीआर दरम्यान पोलीसी खाक्या दाखविला असता, गाडगेनगर हद्दीत पाच गुन्ह्यांची, तर राजापेठ हद्दीतील दोन गुन्ह्यांची गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली. त्यामुळे या चोरीच्या गुन्ह्यासह आठ गुन्ह्यांची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांना शुक्रवारपर्यंत न्यायालयाने पीसीआर दिला असून, आणखी दोन दिवस पीसीआर वाढवून देण्याची विनंती पोलिसांच्यावतीने न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे ठाणेदार ठाकरे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, उपआयुक्त यशवंत सोळंके यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार शेखर गेडाम, सुभाष पाटील, सतीश देशमुख यांच्या पथकाने केली आहे.  तेलगंणा पोलिसांना मथुरा डेअरीत झालेल्या चोरीतील फुटेज पाठविले होते. ते त्यांनी बघितल्यानंतर सदर आरोपींची ओळख पटली. त्यानंतर पथक पाठवून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी आठ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. - मनीष ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरावती