शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

शोभायात्रेतून झळकले गाडगेबाबांचे विचार

By admin | Updated: February 26, 2015 00:16 IST

संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

अमरावती : संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्ताने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक नेहरु मैदान येथून निघालेल्या शोभायात्रेचे उद्घाटन प्र-कुलगुरु जयकिरण तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्ही.एम. मेटकर, एस.डी. कतोरे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक जे.डी. वडते, प्र.वित्त व लेखा अधिकारी संतोष सदार, संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख एम.टी. देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक अरविंद देशमुख, संचालक, श्रीकांत पाटील, संजय देशमुख, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, संचालक, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे संचालक, अविनाश असनारे, शिंगवेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते. संत गाडगेबाबांनी आपल्या हयातीत प्रवास केलेल्या वाहनाने शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेत विद्यापीठाशी संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, डी.सी.पी.ई., बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, विद्यापीठाचा केमिकल टेक्नॉलॉजी विभाग, विद्याभारती महाविद्यालय, आय.बी.बी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, भारतीय महाविद्यालय, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांतील रासेयोचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गाडगेबाबांच्या वेशात हातात झाडू घेऊन गाडगेबाबांचा दशसुत्री संदेश यासह विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांचे विचार शोभायात्रेच्या माध्यमातून सांगितले. विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीच्या रासेयोच्या विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबांच्या संदेशावर पथनाट्य सादर केले. शहराच्या विविध मार्गावरुन मार्गक्रमण करुन शोभायात्रा गाडगेनगरस्थित संत गाडगे महाराज समाधी मंदिरावर पोहोचली त्याठिकाणी गाडगेबाबांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला व शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेचे संचालन राजेश पिदडी यांनी केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या महाविद्यालयांच्या रासेयो पथकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये भारतीय महाविद्यालय, अमरावती, डी.सी.पी.ई., अमरावती, आय.बी.बी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती. इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आलीत. (प्रतिनिधी)