शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

कल्पक प्रयोगातून ‘त्यांना’ मिळाले आत्मभान

By admin | Updated: October 19, 2015 00:29 IST

आयुष्य नेमके किती दिवसांचे, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण, ‘एचआयव्ही’सारख्या गंभीर व्हायरसमुळे आपला मृत्यू समिप आलाय, ...

प्रदीप भाकरे अमरावतीआयुष्य नेमके किती दिवसांचे, हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही, पण, ‘एचआयव्ही’सारख्या गंभीर व्हायरसमुळे आपला मृत्यू समिप आलाय, हे माहिती असूनही त्यांच्यापैकी अनेकांनी एकत्र येऊन सुरू केलेली जगण्याची धडपड आज यशस्वी ठरतेय. या धडपडीतून त्यांनी माळरान फुलविले आहे. मक्त्यावर शेती घेऊन ‘ते’ मागील ४ वर्षांपासून सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग करीत आहेत. उर्वरित आयुष्यात अधिकाधिक ‘जगण्याचा’ त्यांचा प्रयत्न धडधाकट नागरिकांना प्रेरणा देणारा आहे. एचायव्ही संक्रमितांकडून करण्यात येत असलेला सामूहिक शेतीचा प्रयोग महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. या प्रयोगातून त्यांना जगण्याचे आत्मभान मिळाले आहे. सन २००६ मध्ये एचआयव्ही संक्रमित महिला-पुरुषांचाच समावेश असलेली ‘आधार’ संस्था जन्माला आली. संस्थेच्या अधिपत्याखाली सुमारे २५०० एचआयव्ही संक्रमित व्यक्ती एकत्र आले. त्यांना जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात दिला आणि त्यातून १३ बचतगट निर्माण झालेत. एचआयव्ही संक्रमितांचा सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोगबँकांनी अव्हेरले होतेजिल्हा प्रशासन, डापकू व आधार संस्थेच्या मार्गदर्शनात एचआयव्ही संक्रमितांचे बचतगट स्थापन झाले. मात्र, त्यांना कर्ज कोण देणार, हा प्रश्न उभा ठाकला. जिल्ह्यातील अनेक बँकानी अव्हेरले. प्रचंड पायपीट आणि मन:स्ताप झाल्यानंतर अखेर विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँक समोर आली. या बँकेने त्यांना कर्जरुपी आधार दिला व बचतगट खऱ्या अर्थाने सुरू झाले, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली.एचआयव्हीबाधितांना बचत गटांचा आधारएचआयव्ही संक्रमित महिला आणि पुरुषांचे बचत गट तयार करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा उपक्रम जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाने (डापकू) सुरू केला आहे. डापकूच्या मार्गदर्शनात सन २००६ पासून आधार बहुउद्देशीय संस्थेने १३ बचतगट निर्माण केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे या संस्थेशी जुळलेल्या जिल्ह्यातील २५०० पेक्षा अधिक एचआयव्ही संक्रमितांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक हातभार लागला आहे. त्यांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षणसुध्दा देण्यात आलेत. आता बचत गटातर्फे एचआयव्ही संक्रमित व्यक्तिंना सहजीवनासाठी प्रेरित करण्यात येणार आहे.