शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

१२८ बदलीपात्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होतील बदल्या; अनेक जण पाच वर्षे ठाण मांडून बसले एकाच जिल्ह्यात

By गणेश वासनिक | Updated: April 21, 2024 13:18 IST

एकाच जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या; आरएफओंच्या मंत्रालयात येरझारा

अमरावती : राज्यातील बदली पात्र १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलींचे सूत्र मंत्रालयातून हलणार असल्याने अनेक वनाधिकारी मंत्रालयात फिल्डिंग लावताना दिसत आहे. एकाच वेळी होणाऱ्या राज्यस्तरीय बदल्याची धास्ती अनेकांनी घेतलेली आहे. जिल्ह्यात पाच वर्षे ठाण मांडून बसलेल्यांना यावेळेस मात्र बाहेर पडावे लागेल, असे एकंदरीत चित्र आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकारी वनमंत्रालयाने स्वत:कडे घेतलेले आहेत. यामुळे मुख्य वनसंरक्षकांचे बदलींचे अधिकार संपुष्टात आले असून लागेबांधे ठेवत जिल्ह्यात राहणाऱ्या काही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची गोची झालेली आहे. शासन निर्णयानुसार यापुढे सामाजिक वनीकरण, प्रादेशिक वन्यजीव, कार्य आयोजना असा बदली प्रवास करावा लागेल. शिवाय तीन वर्षांच्यावर एकाच ठिकाणी थांबता येणार नाही, कारण आरएफओंचे पद हे राज्यस्तरीय असल्यामुळे बदल्यांचा निकष राज्यस्तरीय लावण्यात येणार आहे. ज्यामुळे जिल्हा बदल होणार आता या निर्णयावरून स्पष्ट झालेले आहेत. कारण महाराष्ट्रातील निवडणूक संपल्यानंतर प्रशासकीय धोरणात शिथिलता येऊन ३१ मे पर्यंत राज्यातील १२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदलीचा पोळा फुटणार हे निश्चित झाले आहे.

मंत्रालयात जोरदार फिल्डिंग१२८ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची बदली यादी १५ मार्च रोजी जाहीर झाल्यानंतर अनेक वनाधिकारी मार्च एंडींगनंतर सक्रिय झालेले आहे. मंत्रालयात सध्या वनसचिव उत्तराखंडमध्ये प्रशिक्षणावर असून ते २९ एप्रिलपासून मंत्रालयात विराजमान होणार आहेत. त्यापूर्वी राज्यातील काही आरएफओ आपापल्या परीने भेटीगाठी कोणी जागा मिळवायची ही सोय तयारी करण्याठी मंत्रालय गाठत आहेत. राज्यातील ७५ च्यावर वनपरिक्षेत्र अधिकारी मंत्रालयाच्या पायरीचे दर्शन करून परतल्याची माहिती आहे.

एकाच जागी ठाण मांडून बसलेतगेल्या ४ वर्षांपासून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या वनप्रशासनाकडे आलेल्या आहेत. मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या वनाधिकाऱ्याशी लागेबांधे असणारे आरएफओ जिल्ह्यात अर्धी अधिक नोकरी करत आहेत. कधी सामाजिक वनीकरणनंतर प्रादेशिक असा बदली प्रवास सध्या सुरू आहेत. जिल्ह्यात राहण्याकरिता लक्ष्मी दर्शन दाखविण्याची प्रथा असल्याने १२८ च्या बदली यादीत १०० च्या जवळ वनपरिक्षेत्र अधिकारी वर्ग ३ प्रमाणे बदल्या करताना दिसून येतात. बनावट कारणे आणि लाखो रुपयांची उलाढाल यामुळे अनेकांना जिल्ह्यात राहतात येते अशी स्थिती आरएफओंच्या बदल्यांमध्ये यास आता मात्र ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगलlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Transferबदली